आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवाला लिहिले पत्र... मागितली माफी अन् नंतर फोडली दानपेटी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागौर (राजस्थान)- चोरट्यांच्या तावडीतून आजकाल देव, मंदिरेदेखील सुटत नाहीत. नागौर शहरातील जैन समाजाच्या काचेच्या मंदिरात अर्धा डझन कुलपे तोडून चोरी झाली. चोरट्याने दानपेटी फोडून 20 हजार रुपयांवर डल्ला मारला. जाताना तिथे एक पत्रही लिहून ठेवले. घर घेण्यासाठी पैसे हवे होते म्हणून चोरी केल्याचे व त्यासाठी देवाची माफी मागण्याचे औदार्य चोरट्याने पत्रात दाखवले आहे, हे विशेष! चोरट्याने तो बिकानेर जिल्ह्यातील गंगाशहर येथील राहणारा असल्याचेही पत्रात नमूद केले आहे. आता पोलिस या पत्रलेखक चोरट्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, नागौर शहरात हिरावाडीजवळ श्री जैन श्वेतांबर मंदिर आहे. नेहमीप्रमाणे भाविक दर्शनासाठी आले तेव्हा त्यांना मंदिराचे कुलूप, कडी तुटलेली दिसली. भाविकांनी मंदिराच्या पदाधिकार्‍यांना याची माहिती दिली. मुख्य दरवाजापासून आतील पाच कुलपे तोडून चोरट्यांनी दानपेटीवर डल्ला मारला होता. दानपेटी 20 हजारांवर रक्कम जमा होती. चोरट्यांनी गर्भगृहाचे कुलूप तोडण्याचाही प्रयत्न केला; पण ते त्यांना जमले नाही. पोलिसांनी फिंगर प्रिंट तज्ज्ञांना बोलावले तेव्हा तेथे एक पत्र लिहून ठेवलेले आढळले. चोरी करून जाताना ते चोरट्याने तेथे ठेवल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
काहे म्हटले पत्रात?

दानपेटीच्या ठिकाणी वहीच्या पानावर लिहिलेले दोनपानी पत्र सापडले. त्यात देवाला, तुम्ही चमत्कारी आहात. मी आपल्या दारात नेहमी दर्शनासाठी येतो. तुम्ही मला मदत करावी. मी एक गरीब माणूस आहे. मला एका घराची गरज आहे. माझ्याकडे धनदौलत नाही. मी गंगाशहरमध्ये राहतो. मी गरीब असून घरमालक भाड्यासाठी व घर रिकामे करण्यासाठी तगादा लावत आहे. त्यामुळे मला तुमच्या रकमेची गरज आहे. तुम्ही माझ्यावर कृपा करावी व मला क्षमा करावी, अशी याचना चोरट्याने केली होती.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, देवाला लिहिलेले पत्र...