आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Robbery News In Marathi, Allahabad Bank, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठवर्षीय मुलीने बँकेतून चोरली सहा लाख रुपयांची बॅग !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यमुनानगर (हरियाणा) - येथील अलाहाबाद बँकेच्या साढौरा शाखेतून एका आठवर्षीय मुलीने पैसे जमा करण्यासाठी आलेल्या ग्राहकाची सुमारे सहा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास केली. बॅग घेऊन पळून जात असताना सुरक्षा रक्षकांनी तिला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोल्ट्री फार्म व्यावसायिक नितेशकुमार हे त्यांच्या खात्यावर पैसे भरण्यासाठी बँकेत गेले होते.
त्या वेळी त्यांच्याकडे सहा लाख रुपयांची रक्कम असलेली बॅग होती. बॅग खुर्चीत ठेवून स्लीप भरत असताना एका आठ वर्षाच्या मुलीने काही कळायच्या आत त्यांची बॅग लंपास केली. त्यांनी आरडाओरड केल्यावर काही अंतरावर सुरक्षा रक्षकांनी मुलीला ताब्यात घेतले. ही मुलगी मध्य प्रदेशातील राजगडची राहणारी असल्याचे सांगत आहे.