आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Robbery Of 50 Lakh In Jewelry Of Rewari Haryana Robbers Captured In CCTV

बंदुकीचा धाक दाखवून तिघांनी लुटले ज्‍वेलर्स, CCTV फुटेज पोलिसांच्‍या हाती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेवाडी - हरियाणामधील रेवाडी शहरात सोहना रोडवर दिवसा एक ज्‍वेलरीचे शोरूम लुटण्‍यात आले आहे. बंदुकीचा धाक दाखवून तीन चोरट्यांनी मनीराम मार्केटमध्‍ये 50 लाख रूपयांचे दागिने लुटले आहेत. विशेष म्‍हणजे ग्राहक बनून आलेल्‍या या भामट्यांनी विक्रेत्‍यांवरच बंदुक रोखून. हे सर्व दृष्‍य CCTV मध्‍ये कैद झाले आहे.
शोरूमचे मालक म्‍हणाले
श्रीश्‍याम ज्‍वेलर्सचे मालक विनोद अग्रवाल यांनी सांगितले की, ही घटना घडली तेव्‍हा त्‍यांचा मुलगा दुकानात होता. दुकानातील एका ग्राहकाला तो दागिने दाखवत होता. तेवढ्यातच दुचाकीवर तीन युवक आले. ते थेट दुकानात शिरले. त्‍यांनी दागिन्‍यांची डिझाईन पाहण्‍यास सुरूवात केली. आधीचे ग्राहक बाहेर पडल्‍यावर या तिघांपैकी एकाने बंदुक काढली नि विक्रेते मोहित यांना दमदाटी केली. दुस-या एकाने शोकेसमध्‍ये ठेवलेली दागिने काढून बॅगमध्‍ये भरली. नंतर तीघांनी बाईकवरून पोबारा केला. त्‍यानंतर विक्रेते मोहित यांची त्‍यांचे वडिल व पोलिसांना याविषयी माहिती दिली. शोरूमशेजारी असलेल्‍या एका चप्‍पल विक्रेत्‍याने त्‍या तिघांपैकी एकाला ओळखले आहे. काही दिवसांपूर्वी तो बुट घेण्‍यासाठी आल्‍याचे त्‍यांनी सांगितले. पोलिस CCTV फुटेजवरून या चोरट्यांचा शोध घेत आहेत. त्‍यासाठी पाच पथकं नेमण्‍यात आल्‍याची माहिती आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो..