आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपनीमध्ये रोबोटने घेतला मजुराचा बळी, मजुराच्या आरपार गेला रोबोटचा हात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
DEMO PIC- रोबोटिक आर्म - Divya Marathi
DEMO PIC- रोबोटिक आर्म
गुडगाव - येथे फॅक्टरीमध्ये काम करताना रोबोटमुळे एका मजूराचा मृत्यू झाला आहे. मानेसर येथील SKH प्लान्टमध्ये बुधवारी ही घटना घडली. ही कंपनी मारुतीच्या कारसाठी इंधनाच्या टाक्या बनवते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 24 रामजी लाल काम करताना रोबोत असलेल्या भागात गेला होता. त्यामुळे रोबोटिक आर्म त्याच्या शरिराच्या आरपार गेला आणि त्यामुळे रोबोटने त्याला मेटल शीट्सवर फेकले. रामजी याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. देशात रोबोटच्या हाताने एखाद्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे.

असा झाला अपघात..
यूपीच्या उन्नावमध्ये राहणारे रामजी दीड वर्षांपासून SKH कंपनीमध्ये लोडरचे काम करत होता. तो वेल्डींग युनिटमध्ये होता. त्याठिकाणीच रोबोटिक वेल्डींग लाइन्सही होत्या. हा अपघात झाला त्यावेळी या युनिटमध्ये 63 वर्कर्स आणि 39 रोबोट ड्युटीवर होते. रामजी यांच्या बरोबर असलेल्या एका मजुराने दिलेल्या माहितीनुसार, “रोबोट मेटल शीट्सच्या वेल्डींगसाठी प्री प्रोग्राम्ड असतात. यादरम्यान एक मेटल शीट खाली पडले. रामजी मेटल शीट्स फिक्स करण्यासाठी चुकून रोबोटसमोर पोहोचला. यादरम्यान रोबोटने त्याला कमरेपासून उचलून वेल्डींग सेक्शनमध्ये फेकले. यावेळी रोबोटिक आर्म त्याच्या शरिरात आरपार घुसला.

मॅनेजमेंटवर आरोप
मारुती उद्योग कामगार युनियनचे सचिव कुलदीप झांगू यांनी अपघातासाठी SKH मॅनेजमेंटला जबाबदार ठरवले आहे. ते म्हणाले, “ही घटना घडण्याचे कारण म्हणजे, मॅनेजमेंटने रोबोट्स अॅक्सिडेंटप्रूफ बनवले नाही. आम्ही या प्रकरणी चौकशी आणि मजुराच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहोत. सर्व युनिट्समध्ये सुरक्षेसाठी जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे, असेही झांगू म्हणाले. प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, काम करताना रामजी रोबोटच्या फार जवळ गेला आणि त्यामुळे रोबोटिक आर्मच्या तावडीत सापडला. त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. CCTV फुटेजची चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कंपनी मॅनेजमेंट आणि कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर इतर सर्व मजुरांनी काम करणे बंद केले.