आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहिंग्या मुस्लिम मिळवत आहेत भारतीय नागरिकत्व; बनावट ओळखपत्रांचा वापर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/वॉशिंग्टन- म्यानमारमधून पळाल्यानंतर भारतात अवैधरीत्या घुसलेले रोहिंग्या मुस्लिम आता बनावट ओळखपत्राद्वारे देशाचे नागरिकत्वही मिळवत आहेत. त्याचबरोबर बांगलादेशातून भारतीय सीमेत घुसखोरी करून देण्यासाठी दलालांचे नेटवर्कही तयार झाले आहे. हा दावा गुप्तचर संस्थांनी सरकारला सोपवलेल्या अहवालात केला आहे. 


अहवालात म्हटले आहे की, बांगलादेश आणि म्यानमारचे रोहिंग्या मुस्लिम भारतात अवैधरीत्या घुसखोरी करत आहेत. सुमारे ४० हजार रोहिंग्या मुस्लिम देशात अवैधरीत्या राहत आहेत. त्यापैकी ७०९६ जण जम्मू-काश्मीरमध्ये, ३०५९ जण हैदराबादमध्ये, १११४ जण मेवातमध्ये (हरियाणा), १२०० जण पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये, १०६१ जण दिल्लीत (ओखला) आणि ४०० जण जयपूरमध्ये राहत आहेत. गृहमंत्री राजनाथ सिंह पश्चिम बंगाल, ईशान्येकडील राज्यांच्या बांगलादेश सीमेशी संबंधित मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी बैठक घेत आहेत. 

 

अमेरिकेच्या संसदेत प्रस्ताव 

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहातील सदस्यांनी म्यानमारमध्ये रोहिंग्यांवरील लष्कराची कारवाई जातीय संहार असल्याची टिप्पणी करत एक प्रस्ताव मंजूर केला आहे. रोहिंग्यांच्या विरोधात अजूनही सुरू असलेली कारवाई थांबवावी, अशी मागणी करण्यात आली. संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुख जैद अल राद हुसैन यांनी चौकशीची मागणी केली आहे. 

 

रोहिंग्यांसाठी बेटावर निवास व्यवस्था 

ढाका-  निर्वासित रोहिंग्यांसाठी बेटावर निवास व्यवस्था करण्याचा निर्णय बांगलादेशने घेतला आहे. बंगालच्या खाडीतील थेंगार चार बेटावर एक लाख रोहिंग्यांची राहण्याची व्यवस्था करण्याच्या योजनेवर बांगलादेश काम करत आहे. हे काम २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. 

बातम्या आणखी आहेत...