आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहिंग्यांंना सरकारकडून दिलासा मिळणे कठीण; नक्वी यांचे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- म्यानमार सोडून पलायन करणारे आणि भारतात घुसखोरी केलेल्या रोहिंग्यांना सरकारकडून काही दिलासा मिळणे कठीण आहे, असे अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे. यासंबंधीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.  

हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यांच्या देशाने त्यांना नाकारले आहे. आपले सरकारही त्यांना दिलासा देऊ शकेल असे मला तरी वाटत नाही, असे नक्वी यांनी सांगितले. म्यानमारच्या पश्चिम राखिने भागातील हिंसाचारानंतर राेहिंग्यांनी देश सोडून पलायन करण्यास सुरुवात केली. अनेक रोहिंग्या जम्मू, हैदराबाद, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर, राजस्थानमध्ये स्थलांतरित झाले आहेत. त्यांना भारतात राहू द्यायचे किंवा नाही, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार आहे. दरम्यान, रोहिंग्या मुस्लिमांनी बेकायदा स्थलांतर केले आहे, अशी भूमिका केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी मांडली होती.  
 
लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकत्रित घ्यायला हरकत नसावी. कारण त्यामुळे कोणालाही मतपेटीचे राजकारण करता येणार नाही. एक देश, एक निवडणूक याप्रमाणे आपण सर्वांनी त्या दिशेने वाटचाल करायला हरकत नसली पाहिजे. एकाच वेळी दोन्ही निवडणुका झाल्यास विकास प्रकल्पांनाही गती देणार आहे.  
 
पंधरा दिवसांत ३ लाखांवर रोहिंग्या बांगलादेशात  
म्यानमारमधील हिंसाचारानंतर २५ ऑगस्टपासून बांगलादेशात जाणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांची संख्या ३ लाखांवर पोहोचली आहे. म्यानमारपासून २७८ किलोमीटर अंतरावर बांगलादेशची सीमा आहे. अनेक रोहिंग्या हे अंतर पायी चालून बांगलादेशात घुसखोरी करू लागले आहेत. त्यांना रोखण्यात बांगलादेशातील सुरक्षा दल कमी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी सुमारे ३०० बोटी बांगलादेशच्या किनाऱ्यावर पोहोचल्या होत्या. गुरुवारपर्यंत घुसखोरी करणाऱ्या रोहिंग्यांची संख्या १ लाख ६४ हजारांच्या घरात पोहोचली होती. म्यानमारमध्ये वंशभेदातून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष वाढला आहे. रोहिंग्यांना बहुसंख्याकांकडून त्यांचे नागरिकत्व नाकारण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...