आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rohtak Gangrape Case Police Found And Mark Crime Place

रोहतक गँगरेप : आत्महत्या करणार होते सर्व आरोपी, पोलिसांनी उघड केले चेहरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक (हरियाणा) - हरियाणातील रोहतक येथे पाच फेब्रुवारी रोजी नेपाळी वंशाच्या एका मुलीवर गँगरेप करुन तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली असून गुरुवारी त्यांची ओळख सार्वजनिक केली आणि त्यांना घटनास्थळी नेऊन पुरावे गोळा केले. ज्या वीटेने तरुणीला ठार करण्यात आले ती वीट पोलिसांनी जप्त केली आहे.

या प्रकरणात एकूण नऊ आरोपी होते, त्यापैकी या घटनेनंतर भयभीत झाला आणि त्याने आत्महत्या केली. उर्वरित आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी गँगरेप करुन तरुणीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. विशेष तपास पथक (एसआयटी) या प्रकरणाचा तपास करत आहे. एसआयटी प्रमुख अमित भाटियांनी सांगितले, पाच आरोपी तरुणीला घेऊन आले होते. नंतर त्यांनी त्यांच्या इतर चार साथीदारांना फोन करुन बोलावून घेतले होते. या प्रकरणातील आठ आरोपींना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. माध्यमांमध्ये या घटनेच्या बातम्या येऊ लागल्यानंतर सर्व आरोपींचा भीतीने थरकाप उडाला आणि त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला होता. त्यापैकी एकाने हा विचार कृतीत उतरवला.
घटनास्थळाहून पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीम स्थापन करण्यात आली आहे. गुरुवारी पोलिसांनी आरोपींना घेऊन घटनास्थळावर कुठे आणि काय-काय घडले याची माहिती घेतली. त्याआधारावर फॉरेन्सिक टीमचे डॉ. रविंद्र पाल आणि डॉ. सरोज दहिया यांनी तांत्रिक आधारावर बारीकसारीक पुरावे गोळा केले. फॉरेंन्सिक टीमच्या सदस्यांचे म्हणणे आहे, की घटनेला एक आठवड्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. त्यामुळे सुक्ष्म पुरावे गोळा करुन आरोपींविरोधात प्रकरण मजबूत करणे मोठे आव्हान आहे.
पोलिसांनी सांगितले, की तरुणी पायी घरी जात होती. ढाब्यावर (हॉटेल) दारू पित असलेल्या पाच आरोपींनी तिला हिसार रोडकडे जाताना पाहिले होते. तिथून त्यांनी तिला उचलून नेले आणि तिच्यावर गँगरेप करुन हत्या केली होती. सहा फेब्रुवारी रोजी तिचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदनानंतर पीडितेवर अमानुष अत्याचार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. पीडितेच्या गुप्तांगात 16 सेंटीमीटरपर्यंतचे दगड सापडले होते. शवविच्छेदन अहवालानुसार, गुप्तांगात दगडांचे, सीमेंटचे तुकडे, ब्लेड, खीळे आणि कंडोम टाकण्यात आले होते. मृत तरुणी मानसिक रुग्ण होती आणि रोहतक येथे बहिणीकडे उपचारांसाठी आली होती.

फोटो - आरोपी सुनील माढा आणि पदम

पुढील स्लाइडमध्ये, घटनास्थळी पुरावे गोळा करण्यात आले.