आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rohtak Gangrape Case Police Found The Place Where Accused Killed Girl

रोहतक गँगरेप प्रकरणात नवा खुलासा, विरोध केल्याने पुरावा नष्ट करण्यासाठी केली हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक - हरियाणाच्या रोहतकमध्ये नेपाळी तरुणीची गँगरेपनंतर हत्या केल्याच्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. तरुणीने आरोपींनी बलात्कारानंतर विरोध केला होता. तसेच तिला आरोपींची नावे कळली होती. त्यामुळे पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी तरुणीची हत्या केली.
फोटो - याच जागेवर नेपाळी तरुणीबरोबर झाला होता बलात्कार
बलात्कारानंतर नऊपैकी सहा आरोपी घटनास्थळाहून निघून गेले होते. उर्वरित तिघांवर या मुलीला कोठेतरी सोडून देण्याची जबाबदारी होती. त्यासाठी ते तरुणीला घेऊन चालले होते. पण घाबरलेल्या तरुणीने त्यांना विरोध केला. त्यावेळी तरुणी त्यांना असे काहीतरी म्हणाली की, त्यांना भेद उघडले जाईल की काय अशी भीती वाटली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गँगरेपदरम्यान आरोपी एकमेकांची नावे घेऊन बोलत होते. त्यामुळे तरुणीला त्यांची नावेही समजली होती. त्यामुळेच आरोपींनी तरुणीची हत्या केली.

माजी सरपंचांचा मुलगा असलेल्या प्रमोदने तरुणीच्या डोक्यात वीट घातली. तसेच तिच्या गुप्तांगावरही वार केले. तिचा मृतदेह अकबरपूर गावाच्या कालव्याजवळ ज्या शेतात सापडला ते शेत बलात्कार झाला त्या ठिकाणाहून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर आहे. कालव्यात पाणी असल्यास तरुणीचा मृतदेह त्यात टाकून देऊ असा विचार करून आरोपी तिचे शव घेऊन याठिकाणी आले होते. पण कालव्यात पाणी नव्हते. त्यामुळे त्यांनी तरुणीच्या शरिराचे तुकडे-तुकडे केले.

न्यायवैद्यक पथक जमा करणार पुरावे
नेपाळी तरुणीबरोबर करण्यात आलेल्या क्रौर्याच्या खुणा आजही या शेतामध्ये आहेत. पुरावे नष्ट होऊ नये म्हणून पोलिसांनी येथे कडक बंदोबस्त तैनात केला आहे. आता मधूबनहून येणारी फॉरेन्सिकची टीम येथे येऊन पुरावे गोळा करणार आहे.

न्याय न मिळाल्यास आंदोलन
या प्रकरणामध्ये योग्य न्याय न मिळाल्यास देशभरात आंदोलन करणार असल्याचे अखिल भारतीय नेपाळी एकता समाजाचे प्रमुख मित्रपाल शर्मा म्हणाले आहेत. यासंदर्भात नेपाळी दुतावास आणि पंतप्रधानांना पत्र लिहिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पुढील स्लाइड्वर पाहा, घटनास्थळाचे आणि आंदोलक महिलांचे PHOTOS...