आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Row Over Plan For 'Composite Townships' For Kashmiri Pandits

काश्मिरी पंडितांच्या वसाहतींना विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटद्वारे काश्मिरी पंडितांच्या परतीविषयी मतप्रदर्शन केले आहे. काश्मीर खोर्‍यात काश्मिरी पंडितांची परती होणे स्वागतार्ह असून त्यांच्या विशेष वसाहती वसवण्यात येऊ नयेत, असे ट्विट ओमर यांनी केले आहे.

काश्मीर खोर्‍यातील त्यांच्या वसाहती असुरक्षित ठरतील, त्याचे कोणतीही काश्मिरी व्यक्ती समर्थन करू शकणार नाही. काश्मिरी पंडित पूर्वीसारख्याच वसाहसाहतींचे समर्थन करत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. आपली पार्टी पंडितांच्या परतीचे स्वागत करत असून आमच्या संमिश्र संस्कृतीच्या संवर्धनासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही ट्विट ओमर यांनी केले आहे.
६२ हजार पंडितांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिली आहे. यासाठी जमीन निश्चित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांना देण्यात आले आहेत. १९९० मध्ये हे पंडित काश्मीर खोर्‍यातून विस्थापित झाले होते. दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये पूरग्रस्तांची स्थिती बिकट असून १५ एप्रिलपासून त्यांना पूरग्रस्त निधी व सामग्रीचे वितरण होईल.