आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Row Over Sell Of Rajesh Khanna Bunglow Aashiwaad

90 कोटींना विकला गेला राजेश खन्नांचा \'आशीर्वाद\'; मैत्रीण अनिता जाणार कोर्टात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ब़ॉलिवूडचे पहिला सुपरस्टार दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांचा मुंबईतील बंगला ''आशीर्वाद'' विकण्याच्या बातमीने वादाला तोंड फुटले आहे. राजेश खन्नांची मैत्रीण अनीता अडवाणी यांनी या विक्रीविरोधात कोर्टात जाणार असून, तशी नोटीसही पाठवणार असल्याचे म्हटले आहे. कार्टर रोडवर असलेल्या या बंगल्याला उद्योगपती आणि ऑलकार्गो लॉजेस्टीक कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष शशी किरण शेट्टी यांनी 90 कोटीला विकत घेतले आहे. मात्र अजून शेट्टी यांनी अशा कोणत्याही बातमीचा स्वीकार केलेला नाही.

अनीता अडवाणीने केला विरोध
अनीता म्हणाल्या की, मी या बंगल्याच्या विक्रीविरोधात कोर्टात जाणार आहे. कोर्टात या प्रकरणी खटला सुरू असताना या बंगल्याची विक्री कशी काय होऊ शकते? मला असे वाटते की, या बंगल्याचे संग्रहालय बनवावे आणि राजेश खन्नांच्या चाहत्यांचेही हेच मत आहे.
मुलींना मिळणार पैसा
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 603 चौरस मीटरच्या या बंगल्याच्या विक्रीने दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या कन्या ट्विंकल आणि रिंकी खन्ना यांना फायदा होणार आहे. समुद्राकिनारी असलेला हा बंगला करोडो चाहत्यांसाठी आकर्षणाचे ठिकाण होते.

विकत घेणार्‍याच्या नावावर संशय
'आशीर्वाद' विकत घेण्यासंदर्भात जेव्हा शशी किरण शेट्टी यांच्याशी संपर्क साधण्यात आला, तेव्हा त्यांना या प्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला. त्यांची कायदा सल्लागार कंपनी मानेक्षा अॅण्ड सेठनानेही खरीददाराचे नाव सांगण्यास नकार दिला. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालकी हक्कासंदर्भात थर्ड पार्टीच्या दाव्यासाठी देण्यात आलेल्या 14 दिवसांच्या नोटीस कालावधी संपल्यानंतर या बंगल्याच्या विक्रीची प्रक्रिया पूर्ण होईल. तर शेट्टी मागील काही वर्षांपासून शहरात बंगल्याचा शोध घेत होते. यासाठी त्यांनी 100 कोटींची रक्कम राखून ठेवली होती.

फाइल फोटो: राजेश खन्‍ना यांचा मुंबईच्या कार्टर रोडवरील बंगला 'आशीर्वाद'