आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Royal Challangers Benguluru Beat Rajasthan Royals In IPL

IPL : विराट विजयाचा दणका, बंगळुरूचा राजस्थानवर ९ गड्यांनी विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने शुक्रवारी अाठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट विराट विजयाची नाेंद केली. बंगळुरू संघाने राजस्थान राॅयल्सवर ९ गड्यांनी मात केली. विराट काेहली (नाबाद ६२) अाणि एल्बी डिव्हिलर्स (नाबाद ४७) यांच्या अर्धशतकी भागीदारीच्या बळावर बंगळुरू संघाने सामना जिंकला. यासह बंगळुरू संघाने स्पर्धेत दुसऱ्या विजयाची नाेंद केली. तसेच शेन वाॅटसनच्या राजस्थान संघाला यंदाच्या सत्रात दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.

प्रथम फलंदाजी करताना राजस्थान राॅयल्स संघाने नऊ बाद १३० धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात बंगळुरू संघाने एका गड्याच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. बंगळुरू संघाने १६.१ षटकांत सामना जिंकला. धावांचा पाठलाग करणाऱ्या बंगळुरू संघाकडून स्फाेटक फलंदाज क्रिस गेल (२०) अाणि सलामीवीर विराट काेेहलीने दमदार सुरुवात केली. या दाेघांनी संघाला ३६ धावांची सलामी दिली. दरम्यान, शेन वाॅटसनने गेलला बाद केले.

नाणेफेक जिंकून बंगळुरू संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या वेळी फलंदाजीसाठी अालेल्या राजस्थान राॅयल्स संघाची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर अजिंक्य रहाणे (१८) अाणि कर्णधार शेन वाॅटसन (२६) फार काळ मैदानावर अाव्हान कायम ठेवू शकले नाहीत. स्टुअर्ट बिन्नी २० धावांची खेळी करून तंबूत परतला. स्टीव्हन स्मिथने संघाकडून सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली.

मिशेल स्टार्कची धारदार गाेलंदाजी
बंगळुरू संघाच्या मिशेल स्टार्कने धारदार गाेलंदाजी करताना शानदार तीन विकेट घेतल्या. त्याने चार षटकांत २२ धावा देत हे यश संपादन केले. तसेच हर्षल पटेल अाणि चाहलने प्रत्येकी दाेन गडी बाद केले. राजस्थानच्या चार फलंदाजांनी धावांचा दुहेरी अाकडाही पार केला नाही.

विराट काेहलीचे दुसरे अर्धशतक
बंगळुरूकडून जबरदस्त फाॅर्मात असलेल्या काेहलीने शुक्रवारी यंदाच्या सत्रात सलग दुसऱ्या अर्धशतकाची अापल्या नावे नाेंद केली. त्याने राजस्थानविरुद्ध नाबाद ६२ धावा काढल्या. यापूर्वी त्याने गत सामन्यात चेन्नईविरुद्ध अर्धशतक ठाेकले हाेते. काेहली व डिव्हिलर्सने विराट खेळी केली. या दाेघांनी दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य ९८ धावांची भागीदारी केली. यात काेहलीने अर्धशतकाचे याेगदान दिले. त्याने ४६ चेंडूंचा सामना करताना एका चाैकारासह तीन षटकार ठाेकून नाबाद ६२ धावा काढल्या. डिव्हिलर्सने ३४ चेंडूंत नाबाद ४७ धावा काढल्या.
पुढील स्लाइड्सवर पाहा, स्कोअर कार्ड आणि पॉइंट्स टेबल