आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉलिटिकल एन्ट्रीसाठी सज्ज आहेत या प्रिन्सेस, असे सुरू आहे सोशल वर्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिन्सेस रुक्षमणी - Divya Marathi
प्रिन्सेस रुक्षमणी
जयपूर - जयपूरच्या राज परिवारातील सदस्य आणि प्रिन्सेस दीया कुमारी आमदार झाल्यानंतर आता राजस्थानच्या राजधानीतील आणखी एक प्रिन्सेस राजकारणात पाऊल ठेवण्याची तयारी करीत आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात व्यस्त ठेवले आहे. कोण आहेत या प्रिन्सेस आणि काय आहे त्यांचे बॅकग्राऊंड....
राजकारण हे गरीबांपासून श्रीमंत आणि लबाडांपासून सज्जनांपर्यंत सर्वांनाच खुणावणारे क्षेत्र आहे. राजकारणात येण्याचा प्रत्येकाचा अजेंडा वेगळा असला तरी सांगण्याचा हेतू एकच असतो, तो म्हणजे समाजाच्या हितासाठी राजकारणात येत आहे.
- जयपूरच्या चौमूं येथील ठाकूर कर्नल जितेंद्रसिंह नाथावत कच्छावा वंशाच्या प्रिन्सेस रुक्षमणी यांनी राजकारणात येण्याची तयारी केली आहे.
- जितेंद्रसिंह यांचे पुत्र आदित्यसिंह यांच्या त्या ठकुराणी आहेत.
- रुक्षमणी देओदर या गुजरातच्या ठाकूर मानसिंह प्रतापसिंह वाघेला यांच्या कन्या आहेत.
- रुक्षमणी यांचे पती आदित्यसिंह माजी लष्कर अधिकारी आहेत.
असा सुरु आहे राजकारणातील चंचूप्रवेश
- रुक्षमणी गेल्या काही वर्षांपासून सामाजिक कामांमध्ये अग्रेसर आहेत.
- राजपरिवारासाठी हे नवे नाही कारण सामाजिक काम करणे हे राजपरिवाराचे सुरुवातीपासून काम राहिलेले आहे. त्यामुळे प्रिन्सेस रुक्षमणी यांचाही ओढा सामाजिक कार्याकडे वाढला आहे.
- प्रिन्सेस रुक्षमणी या लोकांची विविध प्रकारे मदत करत आहेत. विशेषतः गाव-खेड्यातील मुलांच्या शिक्षणाकडे त्यांनी लक्ष दिले आहे.
- यामुळेच गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कामाची चर्चा देशभरातील सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारण्यांमध्ये होत आहे.
सक्रिय राजकारणात येण्याची चर्चा
- राज्यात होणाऱ्या राजकीय, पूर्वाश्रमीच्या राजपरिवारांच्या आणि उद्योजकांच्या विविध कार्यक्रमांमध्ये प्रिन्सेस रुक्षमणी दिसत असतात.
- त्यांच्या आकर्षक सामाजिक व्यक्तीमत्वामुळे विविध कार्यक्रमांमध्ये त्यांच्या कामाचे कौतूक होत असते.
- त्यामुळे अशी चर्चा आहे की त्या लवकरच सक्रिय राजकारणात प्रवेश करतील.
- मात्र यावर प्रिन्सेस रुक्षमणी यांचे उत्तर तोलून-मापून आहे. त्या म्हणतात सध्या समाजिक कामांमध्ये आनंद येत आहे, हेच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे.
- जर हे काम पुढे घेऊन जाण्यासाठी राजकारणाची मदत घ्यावी लागत असेल तर हरकत नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, प्रिन्सेस रुक्षमणी यांचे काही निवडक फोटोज्...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...