आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Royal Scindia Family Profile Jyotiraditya Scindia Birthday Special

भेटा ग्वाल्हेरच्या ROYAL FAMILY ला, सून राजकन्या तर मुलगा आहे राजनेता!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुनाचे खासदार आणि ग्वाल्हेर राजघराण्याचे राजे ज्योतिरादित्य सिंधिया यांचा आज (एक जानेवारी) वाढदिवस. यानिमित्त Divymarathi.com वाचकांसाठी सिंधिया रॉयल फॅमिलीची माहिती देत आहे.

ज्योतिरादित्य यांचा जन्म एक जानेवारी 1971 ला झाला. त्यांचे वडील माधवराव सिंधिया कॉंग्रेसचे नेते होते. ज्योतिरादित्य यांच्या आत्या वसुंधरा राजे- सिंधिया राजस्थानच्या मुख्यमंत्री आहेत. तर दुसर्‍या आत्या यशोधरा राजे या मध्यप्रदेशच्या क्रीडामंत्री आहेत. ज्योतिरादित्य यांना दोन मुले असून महानआर्यमन आणि अन्नयाराजे अशी दोघांची नावे आहेत.

प्रियर्शनीसोबत विवाह...
ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या पत्नीचे नाव प्रियदर्शनी राजे आहे. प्रियदर्शनी राजे यांचा जन्म गुजरातमधील बडोदा येथील गायकवाड मराठा राजघराण्यात झाला. प्रियदर्शनी यांची आई नेपाळ राजघराण्यातील आहेत. प्रियदर्शनी आणि ज्योतिरादित्य यांचा विवाह 12 डिसेंबर 1994 ला झाला.

माधवराव सिंधिया यांच्या पश्चात ज्योतिरादित्य बनले महाराजे...
माधवराव सिंधिया यांचे 30 सप्टेंबर 2001 रोजी एका विमान दुर्घटनेत निधन झाले. याघटनेनंतर संपुर्ण जबाबदारी ज्योतिरादित्य सिंधिया यांना स्वीकारावी लागली. स्टेनफोर्ड हॉवर्ड येथून उच्च शिक्षण घेऊन परतलेले ज्योतिरादित्य यांच्यासमोर वडिलांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणे एक मोठे आव्हाण होते. राजघराण्यासह ज्युनिअर सिंधिया यांना आपल्या वडिलांचा राजकीय वारसा स्विकारावा लागला.

प्रियदर्शनी यांचे नाव देशातील सगळ्यात सुंदर राजकुमारीमध्ये घेतले जात होते. 2012 मध्ये प्रियदर्शनी यांचा देशातील टॉप 50 सुंदर महिलांमध्ये समावेश करण्‍यात आला होता. 2008 मध्ये बेस्ट ड्रेस्ड हॉल ऑफ फेम लिस्टमध्येही प्रियदर्शनी यांच्या नावाचा समावेश करण्‍यात आला होता.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, सिंधिया परिवाराची खास PHOTOS......