आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉयल वेडिंगचे रोचक विधी: वराने केला नवरीच्या पायांना स्पर्ष, अशी घातली वरमाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्हैसूर नरेश यदुवीर यांनी नववधूच्या पायात जोडवे घातले. - Divya Marathi
म्हैसूर नरेश यदुवीर यांनी नववधूच्या पायात जोडवे घातले.
जयपूर - म्हैसूरच्या 600 वर्षे जुन्या राजघराण्याचे राजे यदुवीर वाडियार यांचे सोमवारी येथील डूंगरपूरची राजकुमारी तृषिकासोबत लग्न झाले. म्हैसूर पॅलेजमध्ये झालेल्या शाही विवाह सोहळ्याला मंडप आणि वराह पुजेने सुरुवात झाली होती. दक्षिण भारतातील अनेक विधी यावेळी साग्रसंगीत पार पडले. त्यातील काही विधी हे रोचक होते. राजाने नव्या नवरीचे पाय हातात घेऊन तिच्या पायांच्या बोटांमध्ये जोडवे चढवले.
रॉयल वेडिंगचे रोचक विधी
- शाही विवाह सोहळ्यात अनेक विधी हे सामान्यांना अचंबित करणारे होते. वरमाला घालताना वर-वधूला एका मोठ्या भांड्यात उभे करण्यात आले होते.
- त्यानंतर पानाचा विडा देण्याचा विधी झाला. तर सप्तपदी आधी वराने नववधूच्या पायात स्वतःच्या हाताने जोडवे घातले.
- म्हैसूरचे राजे यदुवीर वाडियार यांचे राजस्थानमधील डूंगरपूर येथील राजकुमारी तृषिका सिंहसोबत सोमवारी लग्न झाले.
- लग्नविधींना शनिवारपासून सुरुवात झाली होती. हे विधी 29 जून पर्यंत चालणार आहेत.
- देशातील काही जून्या राजघराण्यांपैकी म्हैसूरचे वाडियार घराणे आहे. 600 वर्षे जून्या या राजपरिवारात 40 वर्षांनंतर एखादा विवाह सोहळा होत आहे.
- या शाही सोहळ्यातील विधींसाठी 12 मंदिरांचे पंडित बोलावण्यात आले आहेत.

पुढील स्लाइडमध्ये पाहा रॉयल वेडिंगमध्ये कोणकोणते विधी झाले....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...