आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Royal Wedding Of Yuvraj Lakshya Raj Singh Of Udaipur

राजकुमाराचा शाही विवाह सोहळा, सोन्‍याची शेरवानी अन् लाखोंचा लहेंगा, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूरचे राजकुमार लक्ष्‍यराज सिंग आणि उडीसाची राजकुमारी निवृति कुमारी यांचा शाही थाटात 19 जानेवारी 2014 रोजी झालेला विवाह ऐतिहासिक ठरला. या विवाहात नव-यामुलासाठी चक्क सोन्‍याची शेरवानी तयार करण्‍यात आली होती. तर नववधूसाठी लाखो रूपयांचा लहेंगा तयार करण्‍यात आला होता. या लहंग्‍यात डिझायीनसाठी सोन्‍या-चांदीच्‍या तारा वारण्‍यात आल्‍या होत्‍या. मेवाड राजघ-यातील विवाह असल्‍यामुळे थाट-बाट काही औरच होता. नव-या मुलासाठी उदयपूरहून अंबारीसह सजलेला हत्ती बोलावण्‍यात आला होता.
लग्‍न सोहळ्यात 51 पंडितांनी केली पूजा-
राज घराण्‍यातील विवाह सोहळा असल्‍यामुळे जवळपास 51 पंडितांनी वैदिक मंत्राचा वापर करून पूजा केली.
राजकुमारीसाठी 21 लाखाचा लहेंगा-
राजकुमारी निवृति कुमारीसाठी 21 लाख रूपयांचा लहेंगा तयार करण्‍यात आला होता. लहेंगा तयार करण्‍यासाठी चोने-चांदीच्‍या ताराचा वापर करण्‍यात आला होता. हा लहेंगा उदयपूरच्‍या शाही परिवाराकडून नववधूसाठी पाठवण्‍यात आला होता.
राजकुमारासाठी सोन्‍याची शेरवानी-
राजकुमार लक्ष्‍यराज सिंगसाठी 11 सूट तयार करण्‍यात आले होते. यामध्‍ये वे्डिंग शेरवानी, सुट, ब्रिजिश आणि नॅरो जॅकेटचा समावेश होता. नव-यामुलासाठी आणण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक सुटसाठी सोन्‍याची बटन वापरण्‍यात आली होती.
पुरूषांसाठी एक लाख रूपये किमतीचे ड्रेसेस-
या शाह‍ी विवाहसोहळ्यात 100 पूरूषांसाठी विशिष्‍ट प्रकारची सुट तयार करण्‍यात आले होते. या सुटची प्रत्‍येकी किमंत एल लाख रूपये होती.
37 वर्षानंतर मेवाड घराण्‍याला लाभली नववधू-
मेवाड राजघराण्‍याच्‍या सिटी पॅलेसमध्‍ये तब्बल 37 वर्षानंतर नववधूने प्रवेश केला. या अगोदर या घराण्‍यातील अरविंद सिंग मेवाड यांनी विजिया राज कुमारीसोबत लग्‍न करून तिला या राजवाड्यात आनले होते.
नोट-19 जानेवारी 2014 मध्‍ये मेवाड घराण्‍यातील राजकुमार लक्ष्‍यराज सिंग यांच्‍या लग्‍नाला वर्षे पूर्ण झाले. लक्ष्‍यराज सिंग यांच्‍या लग्‍नाचा पहिला वाढदिवसा निमित्त माहिती देत आहोत.
पुढील स्‍लाईडवर पाहा या शाही विवाह सोहळ्याची छायाचित्रे...