आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळी देण्‍यासाठी मुलींची पूजा करताना कॉन्‍स्‍टेबलला अटक, घरात आढळले सांगाडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनबाद- अधश्रद्धेतून नरबळी देण्‍याची एक घटना उघडकीस आली आहे. रेल्‍वेत कॉन्‍स्‍टेबलवर नरबळी दिल्‍याचा आरोप असून 2 सख्‍ख्‍या लहान बहिणींचाही तो बळी देणार होता. परंतु, वेळीच कारवाई केल्‍यामुळे या बहिणींचे प्राण वाचले.

झारखंडमध्‍ये रांगाटाई खटाई गावात रेल्‍वे क्‍वार्टरमध्‍ये राहणा-या मुनीलाल या कॉन्‍स्‍टेबलला काल अटक करण्‍यात आली. दोन चिमुकल्‍यांचे हातपाय बांधून त्‍याच्‍या घरात पुजा करण्‍यात येत होती. दोघींचा नरबळी दिला जाणार होता. परंतु, मुलीचे नातेवाईक त्‍यांना शोधत त्‍याच्‍या घरात शिरले आणि वेळीच त्‍यांचे प्राण वाचले. मुलीचे नातेवाईक घरात शिरताच मुनीलाल आक्रमक झाला आणि त्‍याने त्रिशुळ घेऊन त्‍यांच्‍यावर हल्‍ला चढविला. त्‍यात मुलीचे वडील उमेश यादव आणि आजोबा राजनाथ यादव जखमी झाले. तरीही त्‍यांनी झटापटीनंतर मुनीलालला पकडून पोलीस ठाण्‍यात नेले. यादव कुटुंबियदेखील जवळच राहतात. मुनीलाल दारुच्‍या नशेत होता.