आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संतप्त फेरीवाल्यांनी आरपीएफ जवानांना पळवून पळवून मारले, एकाचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालदा- पश्चिम बंगालमधील मालदा रेल्वे स्टेशनवर संतप्त फेरीवाल्यांनी (हॉकर्स) रेल्वे पोलिस फोर्सच्या (आरपीएफ) एका जवानांनी हत्या केल्याची घटना घडली आहे. मालदा स्टेशन परिसर सोमवारी (25 मे) संतप्त फेरीवाल्यांनी काही जवानांवर हल्ला चढवला. जवानांना पळवून पळवून अमानुष मारहाण केली. त्यातच एका जवानाचा मृत्यू झाला. समरेंद्र असे मृत जवानाचे नाव आहे. जमावाला पांगवण्यासाठी आरपीएफला 13 राउंड फायरिंग देखील करावी लागली. याप्रकरणी पो‍लिसांनी मालदा स्टेशनवरील अनेक फेरीवाल्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


मिळालेली माहिती अशी की, मालदा स्टेशनवर सोमवारी (25 मे) काही आरपीएफ जवानांनी एका फेरीवाल्यांवर कारवाई करत त्याला जबर मारहाणही केली होती. या कारवाईमुळे फेरीवाले प्रचंड संतापले. आरपीएफ जवान विनाकारण त्रास देतात. आमच्याकडून रुपये उकळतात. रुपये दिले नाही तर जबर मारहाण करतात, असा आरोप फेरीवाल्यांनी केला आहे.

सोमवार सकाळी नऊ वाजता मालदा टाउन स्टेशनच्या प्लॉटफॉर्म क्रमांक तीन वर छोटनदास नामक एक फेरीवाला पुरी-भाजी विकत होता. या वेळी न्यू जलपाईगुडी- हावडा शताब्दी एक्स्प्रेस उभी होती. चार-पाच आरपीएफ जवान छोटनदासच्या दिशेने आले आणि त्याला मारहाण करू लागले. जवान छोटनदासला मारहाण करताना पाहून इतर फेरीवाल्यांनी जवानांवर हल्ला चढवला. फेरीवाल्यांनी आरपीएफच्या जवानांना पळवून पळवून मारहाण केले. या मारहाणीत समरेंद्र या जवानाचा मृत्यू झाला.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर मालदा टाउन स्टेशनवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पूर्व रेल्वेचे महाव्यवस्थापक आर.के.गुप्ता यांनी मुख्य सचिव संजय मित्रा यांना पत्र लिहून स्टेशनच्या राज्य सरकारची मदत मागितली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, मालदा स्टेशनवर आरपीएफ जवानांना पळवून पळवून मारहाण करणार्‍या फेरीवाल्यांचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...