आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rs 1 Crore In Cash, Over 400 Gold Bangles Seized In Karnataka

बेळगावात 1 कोटीची रोख, सोन्याच्या 400 पाटल्या जप्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेजवळ मंगळवारी 1 कोटी रुपये रोख आणि साडेचार किलो वजनाच्या सोन्याच्या बांगड्या सापडल्या. हे प्रकरण निवडणुकीशी संबंधित असावे. ही कारवाई कर्नाटकच्या अधिका-यांनी केली आहे. पाच मे रोजी होणा-या विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग टाळण्यासाठी ही कृती करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी अनिल कुमार झा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. परंतु त्याविषयी सविस्तर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

सोमवारपासून या भागात कारवाई करण्यात येत आहे. बेळगाव (सात लाख), चित्रदुर्ग (3.4 लाख), अथानी (20 लाख), बागलकोट (21 लाख), नरसिपुरा (5 लाख) या भागात रोख रक्कम सापडली. याच भागातून सोन्याच्या 406 बांगड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. या भागातून अजूनही रोख रक्कम सापडू शकते. त्यासाठी परिसरात निमलष्करी दलास पाचारण करण्यात आले आहे.