आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS Chief Mohan Bhagwat Comment On Conversion Issue

हिंदू जागा होतोय आता घाबरण्याची गरज नाही, मोहन भागवत यांचे धर्मांतरावर वक्तव्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य टाळावीत, यासाठी अखेरचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनाम्याची धमकी दिल्याचे समजते. मात्र, दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्मांतराच्या मुद्यावर भाष्य केले आहे. हिंदू जागा होतोय आता घाबरण्याची गरज नाही. तसेच हिंदू धर्म कोणावरही दबाव आणत नसून रस्ता भरकटलेल्यांना परत घरी आणण्याची गरज असल्याचे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. सरसंघचालक भागवत आज (शनिवारी) कोलकात्यात बोलत होते.
भारत ही हिंदूंची भूमी असून त्यांनी आपली भूमी सोडयची नाही. पाकिस्तान देखील भारताची भूमी आहे. ज्यांना धर्मांतरण पसंत नाही त्यांना कायदा आणावा. 1945 मध्ये फाळणीच्या मुद्यातून पाकिस्तानचा जन्म झाला. पाकिस्तान पर्मानेंट नाही. परिवर्तनासाठी आता जास्त काळ शिल्लक राहिलेला नाही. उलट-सुटल चर्चा करणारे लोक जगात खूप भेटतील. त्यांचे ऐकून मनात किंतु-परंतुची शंका मुळीच निर्माण होऊ देऊ नका, असे आवाहनही भागवत यांनी जनतेला केले आहे.

दुसरीकडे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
धर्मांतराच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार गदारोळ सुरु आहे. यामुळे भाजप सरकारीच प्रतिमा मलिन होत आहे. याची दखल घेऊन पक्षाने या मुद्यावर अधिकृत भूमिका स्पष्ट केली.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, काय म्हणाले भाजप अध्यक्ष अमित शहा