आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिराला मुस्लिमांचा नव्हे, कट्टरतावादी आणि गुंडांचा विरोध, मोहन भागवतांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- रामजन्म भूमीत राम मंदिर उभारण्यास मुस्लिम आणि ख्रिश्चनांचा विरोध नाही, तर त्यांच्या नावावर राजकारण करणारे कट्टरतावादी आणि गुंड लोकांचा आहे, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. भागवत झारखंडमधील देवघरमध्ये बोलत होते.

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा परस्पर समजुतीने सोडवावा, या वादावर कोर्टात तोडगा निघणार नसल्याचेही काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधिश जे.एस.खेहर यांनी म्हटले होते.

मोहन भागवत झारखंडमधील देवघर येथे काल (मंगळवारी) झालेल्या धर्म संस्कृती रक्षण समितीच्या हिंदु संमेलनात सहभागी झाले होते. संमेलनात संबोधित करताना त्यांनी राम मंदिर मुद्द्याला हात घातला.

भागवत म्हणाले, आता स्वत:ला हिंदु म्हणून घेणार्‍या लोकांनी सज्ज राहायला हवे. अयोध्या ही राम जन्म भूमी असून तिथेच राम मंदिर उभारले जावे, ही हिंदुस्थानातील जनतेची श्रद्धा आहे. आता राम मंदिरावर कोर्टात तोडगा निघणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

गोहत्येवर काय म्हणाले मोहन भागवत?
संपूर्ण देशात गोहत्येला विरोध करणारा कठोर कायदा व्हायला हवा. गायींचे संरक्षण करताना कायदाचे उल्लंघन होता कामा नये, असेही भागवत यांनी गोरक्षक समुहांना सल्ला दिला आहे. दिल्लीत रविवारी महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भागवत बोलत होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन,  राम मंदिर-बाबरी प्रकरण: सुप्रीम कोर्ट म्हणाले, 'स्वामी मुख्य पक्षकार नाही'

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...