आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर फक्त राम मंदिरच उभं राहणार अन्य काही नाही: सरसंघचालक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, केवळ लोकांना चांगले वाटावे यासाठी राम मंदिराची घोषणा केलेली नाही. - Divya Marathi
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, केवळ लोकांना चांगले वाटावे यासाठी राम मंदिराची घोषणा केलेली नाही.

उडपी- अयोध्येच्या वादग्रस्त जागेवर फक्त राम मंदिरच बनेल. तिथे दुसरी काेणतीही पायाभरणी करू दिली जाणार नाही. या ठिकाणी लवकरच भगवा ध्वज फडकेल, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. कर्नाटकच्या उडपीमध्ये शुक्रवारी धर्मसंसदेच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. विशेष म्हणजे, अयोध्या प्रकरणाची शेवटची सुनावणी ५ डिसेंबरपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होणार असून त्याच्या काही दिवस आधीच भागवतांनी हे वक्तव्य केले आहे.  ते म्हणाले, ही लोकांना लालूच दाखवणारी घोषणा 
नसून आस्थेचा विषय आहे. यात काहीच बदल होणार नाही.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...