आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईंचा वाद : हिंदू धर्मात प्रत्येकाला देव निवडण्याचे स्वातंत्र्य, संघाचा पवित्रा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - साईबाबांच्या अवतारावरून सुरू असलेल्या वादात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उडी घेत आपली बाजू मांडली आहे. संघाचे सरकार्यवाह सुरेश भय्याजी जोशी यांच्या मते, साईबाबा यांनी स्वत:ला कधीच ईश्वराच्या रूपात जनतेसमोर सादर केले नाही. त्यांनी सदैव समाजाच्या भल्यासाठी काम करत लोकांसाठीच आपले जीवन वेचले. अशा प्रकारच्या अनेक महापुरुषांना आम्ही नमन करतो. त्यामुळे अशा प्रकारचे अनावश्यक वाद टाळायला हवेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, संघाचे प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी या प्रकरणी संघाचे विचार स्पष्ट केले. ते म्हणाले, हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्तीस आपल्या देवाची निवड आणि त्याची पूजा करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तो वृक्ष, डोंगरालाही देव मानू शकतो आणि त्याची पूजाही करू शकतो. संघातील अनेक स्वयंसेवक साईभक्त असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.

"अयोध्येतच राममंदिर बनावे ही संघाची कायम इच्छा'
अयोध्येतच राममंदिर बनावे अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इच्छा असून याबाबत कोणतेही अन्य मत नाहीच होऊ शकत, असे भय्याजी जोशी यांनी या वेळी ठामपणे सांगितले. ते पुढे म्हणाले, याबाबतचा निर्णय घेणाऱ्यांनी याच दृष्टिकोनातून विचार करायला हवा. तथापि, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे कदाचित याच्या निर्णयास विलंब होऊ शकतो.
काही घटक हिंदू समाज आणि संघाविरोधात षड्यंत्र रचत आहेत. हा आमच्या धर्माचा अपमान आहे. मात्र, यापूर्वीही अशा प्रकारेच हिंदू समाज आणि संघाविरोधात षड्यंत्र रचले गेले आणि अनेक प्रकरणी नावेही जोडली गेली. परंतु चौकशीत तसे काहीच आढळले नाही, असेही त्यांनी सांगितले.