आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS Comment On BJP For Goa Language. Read More News At Divyamarathi.com

गोव्यात मातृभाषेवरून संघाची भाजपवर टीका; सरकारला 4 वर्षे पूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी- गोव्याच्या शालेय शिक्षणात प्राथमिक स्तरावर मातृभाषेचा वापर होण्याची मागणी जोर धरत आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी याचे समर्थन केले आहे.गोवा सरकार यासंबंधीच्या धाेरणात सुधारणा करेल, असेही त्यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे, असा वैश्विक नियम असल्याचे ते म्हणाले. भारतीय भाषा सुरक्षा मंचाने (बीबीएसएम) मातृभाषा संवर्धनाच्या मागणीसाठी रविवारी उत्तर गोव्यात निदर्शने केली.

गोवा सरकारचे धोरण दुटप्पी : गोवा सरकारने स्थानिक भाषेला शैक्षणिक पातळीवर स्थान देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, १२७ इंग्रजी माध्यमातील शाळांना अनुदान सुरू ठेवले आहे. यावर बीबीएसएमने आक्षेप घेतला. सरकार यासंबंधी गांभीर्याने विचार करेल व याची अंमलबजावणी करेल, असे आश्वासन श्रीपाद नाईक यांनी दिले.

संघ प्रांतप्रमुखांची सरकारवर टीका
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा प्रांतप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी गोव्यातील भाजप सरकारवर टीका केली. शालेय स्तरावर स्थानिक भाषांना स्थान देण्याबाबत सरकार उदासीन असल्याचे ते म्हणाले. निवडणुकांच्या वेळी सत्ताधारी पक्षाला दारात उभे करू नका, असे वेलिंगकर म्हणाले. २०१२ मध्ये मतदारांनी विश्वासाने त्यांच्याकडे सत्तासूत्रे दिली. वेलिंगकर हे बीबीएसएमच्या व्यासपीठावरून बोलत होते. ४ वर्षे झाली तरीही कोकणी व मराठीला शालेय स्तरावर स्थान दिले गेले नाही.