आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळच्या CM चे शिर कापून आणा, एक कोटीची प्रॉपर्टी देतो; RSS ची जीभ घसरली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थिरुवनंतपुरम- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उज्जैन (मध्यप्रदेश) येथील महानगर प्रचारप्रमुख डॉ. कुंदन चंद्रावत यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनपई विजयन् यांना धमकी दिली आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांचे शिर कापून आणणाऱ्यास आपण एक कोटी रुपयांची प्रॉपर्टी देऊ,’ असे वादग्रस्त वक्तव्य चंद्रावत यांनी केले आहे.

कुंदन चंद्रावत यांची बुधवारी एका जाहीर सभेत बोलत होते. चंद्रावत म्हणाले की, विजयन् यांनी केरळमध्ये आमचे 350 हून जास्त कार्यकर्त्यांची हत्या केली आहे. दरम्यान, मार्क्सवादींच्या अत्याचाराच्या विरोधात आरएसएसने उज्जैनमध्ये धरणे आंदोलन आणि आक्रोश सभा घेतली. यावेळी भाजपचे खासदार डॉ. चिंतामणी मालवीय यांच्यासह संघ आणि भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. चंद्रावत यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 
 
संघाने अनेकांशी शिर कापली आहेत- मुख्यमंत्री विजयन् 
- संघ परिवाराने अनेकांचे शिर कापले असल्याचे मुख्यमंत्री विजयन् यांनी म्हटले आहे. 
दरम्यान, चंद्रावत यांनी आपले कथित वक्तव्य मागे घेतले आहे. केरळमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांच्या कथित हत्येमुळे दु:खाच्या भरात वक्तव्य केल्याचे चंद्रावत यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...