आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भागवतांच्या कार्यक्रमाला ममता सरकारने परवानगी नाकारली - RSS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सर संघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमासाठी बुक करण्यात आलेल्या सभागृहाचे बुकिंग ममता बॅनर्जी सरकारने रद्द केल्याचा आरोप संघाने केला आहे. 3 ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगालमध्ये भागवतांचा नियोजित कार्यक्रम आहे. दुसरीकडे, सभागृह प्रशासनाने सुरक्षेच्या कारणामुळे बुकिंग रद्द केल्याचा दावा केला आहे. संघाचा आरोप आहे की हा काही पहिलाच प्रसंग नाही याआधीही असे घडले आहे. 
 
काय आहे प्रकरण 
- मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाची संघाच्या स्वयंसेवकांनी तयारी पूर्ण केली होती. मात्र एक महिना आधीच सभागृहाचे बुकिंग रद्द करण्यात आले. 
- सभागृह प्रशासनाने संघाचे आरोप फेटाळून लावले आहे. सभागृह दुरुस्ती आणि रिनोवेशन कार्य सुरु असल्यामुळे बुकिंग रद्द केली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ऑक्टोबरपर्यंत दुरुस्ती काम पूर्ण होऊ शकत नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. 
 
संघ काय म्हणाला? 
- संघाच्या प्रवक्ते जिश्नु बासू यांनी सभागृह प्रशासनाचे स्पष्टीकरण चुकीचे असल्याचे म्हटले. बासू म्हणाले, हे काही प्रथमच होत आहे असे नाही. पश्चिम बंगालमध्ये अशा घटना याआधीही होत आल्या आहेत. यांचा आम्ही निषेध करतो. 
- सिस्टर निवेदिता यांच्या 150व्या जयंती कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भागवत येणार होते. यासाठी महाजाती सदन जूनमध्ये बुक करण्यात आले होते. 
बातम्या आणखी आहेत...