आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS Mouthpiece Attacked Tipu Sultan And Karnataka Government

टिपू सुलतान हा दक्षिण भारताचा औरंगजेब, RSS चे मुखपत्र पांचजन्यमध्ये टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - RSS चे मुखपत्र पांचजन्यमध्ये म्हैसूरचा एकेकाळचा सासक टिपू सुल्तानला दक्षिण भारताचा औरंगजेब संबोधले आहे. या मुखपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या एका लेखामध्ये टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या मुद्दयावरून कर्नाटक सरकारवरही टीका करण्यात आली आहे. या लेखानुसार टिपू सुलतानचे व्यक्तीमत्त्व कायम वादग्रस्त असेच राहिलेले आहे. त्यांची जयंती साजरी करण्याचे एकमेव कारण म्हणजे मुस्लीमांचे समाधान एवढेत आहे. या निर्णयाने टिपूंच समर्थक आणि विरोधक यांच्यात एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

पांचजन्यमध्ये काय लिहिले...
> पांचजन्यमध्ये सतीश पेडणेकर यांचा लेख ‘टीपू सुल्तान का सच - दक्षिण का औरंगजेब’ मध्ये लिहिण्यात आले आहे की, हिंदु संघटनांना टिपू सुलतान धर्मनिरपेक्ष होता असे वाटत नाही. तो असहिष्णू आणि अत्याचारी शासक होता. दक्षिण भारताचा औरंगजेब होता. त्याने लाखोंना बळजबरी मुस्लीम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. अनेक मंदिरे उध्वस्त करण्यासही तो जबाबदार होता.
> लेखात म्हटले आहे की, टिपूच्या विरोधकांच्या मते, त्याने कर्नाटकच्या कूर्ग आणि मँगलोर परिसरात मोठ्या प्रमाणावर हिंदुंची हत्या केली होती. तसेच त्यांना बळजबरी मुस्लीम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले होते. इतिहासातही तसे पुरावे आहेत. 1788 मध्ये टिपू सुलतान यांच्या सैन्याने कूर्ग वर आक्रमण केले होते. त्यावेळी संपूर्ण गावे जाळली होती. टिपू सुलतान यांच्या दरबारातील लेखक मीर हुसेन किरमानी यांनी याबाबत सविस्तर लिहिले आहे. हे सर्व पुरावे असूनही टिपूंचे समर्थक म्हणतात की, ही त्या काळात अगदी सामान्य बाब होती.
> आर्टिकलमध्ये दावा करण्यात आला आहे की, मुस्लीम सुलतानांच्या परंपरेनुसार टिपूने एकदा घोषणा केली होती, की सर्व काफिरांना तो मुस्लीम बनवेल. त्याने लगेचच सर्व हिंदुंसाठी फर्मानही काढले होते. टिपूने त्याच्या कार्यकाळात सुमारे 5 लाख हिन्दुंना बळजबरीने मुस्लीम बनवले होते. हजारोंच्या कत्तली केल्या होत्या. संपूर्ण जग मला मिळाले तरी हिंदुंना संपवणे बंद करणार नाही, असे टिपू म्हणाल्याचा उल्लेखही या लेखात आहे.
> पांचजन्यच्या लेखानुसार टिपू सुलतानने सईद अब्दुल दुलाई आणि त्याचा एक अधिकारी जमान खान यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेखही अनेक ठिकाणी आहे. पत्रानुसार टिपूने लिहिल होतेकी, पैगंबर मोहम्मद आणि अल्लाहच्या कृपेने कालीकतमध्ये सर्व हिंदुंना मुस्लीम बनवले आहे. केवळ कोचीन राज्याच्या सीमावर्ती भागांमध्ये काहींचे धर्मांतर अद्याप झालेले नाही. लवकरच मला त्यातही यश मिळेल.
> छत्रपती शिवाजींनी कधीही मुस्लीमांच्या मशिदी तोडल्या नाहीत, किंवा कधीही बळजबरीने धर्मांतर घडवून आणले नाही. मग त्यांची तुलना टिपू बरोबर कशी करणार. टिपूला ते मुस्लीम असल्यामुळे नव्हे तर त्यांच्या मतान्धतेमुळे विरोध असल्याचा यात उल्लेख आहे.
>त्याचप्रकारे आरएसएसचे इंग्रजी मुखपत्र ऑर्गनायझरमध्येही ‘क्रिएटिंग फॉल्स आयकन्स’ या लेखात, टिपूच्या जयंती सोहगळ्यामागे कर्नाटक सरकारचा चुकीचा मनसुबा असल्याचे लिहिले आहे. हा मनसुबा मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्याचा आहे. सिद्धरमैय्या लालू किंवा मुलायमसारखे भासत आहेत. ते काँग्रेसमध्ये नवे आहेत. अजूनही ते जनता दलाच्या नेत्यासारखे काम करत आहेत.

वाद काय...
> कर्नाटक सरकारने 18व्या शतकातील म्हैसूरचा शासक टिपू सुल्तान यांची 265वी जयंती साजरी केली. बीजेपीशी संबंधित संघटना आणि संघ त्याला विरोध करत आहेत.
> टिपू सुलतानला आरएसएसने क्रूर शासक ठरवले आहेत. तसेच त्यांच्या जयंतीच्या विरोधात आंदोलनही केले.
> कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे आरएसएसचे नेते व्ही नागराज यांनी केलेल्या दाव्यानुसार टीपू सुलतान असा शासक होता, ज्याच्याविषयी कर्नाटकच्या लोकांना द्वेष होता. त्याने चित्रदुर्गा, मंगलोर आणि मध्य कर्नाटकात लोकांचा छळ केला होता.