आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS Passed Resolution About Minorities Population Is Increased

अल्पसंख्याकांची वाढ धोकादायक, संघाच्या कार्यकारी मंडळ बैठकीत ठराव मंजूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - शहरात ३० आॅक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारी मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये सीमावर्ती भागातील लोकसंख्यावाढीच्या असमतोलाविषयी चर्चा झाली. तसेच लोकसंख्येच्या असमतोलाचा ठराव मंजूर करण्यात आला, अशी माहिती संघाचे कोंकण प्रांत संघचालक प्रा. सतीश मोढ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

अासाम, पश्चिम बंगाल व बिहार या राज्यांमध्ये १९५१ मध्ये हिंदू धर्मीयांची लोकसंख्या ८८ टक्के होती. २०११ मध्ये ती ८३.८ टक्क्यांवर आली. मात्र, याच काळात मुस्लिमांची लोकसंख्या ९.८ टक्क्यावरून १४.२३ टक्क्यांवर गेली. अरुणाचल प्रदेश या ईशान्येकडील राज्यात १९५१ मध्ये हिंदू ९९.२१ टक्के होते, २०११ मध्ये ते ६७ टक्क्यांवर आले. मात्र, याच राज्यात एका दशकात ख्रिश्चनांची १३ टक्क्यांनी लोकसंख्या वाढली. मणिपूरमध्ये १९५१ मध्ये हिंदू ८१ टक्के होते, २००१ मध्ये त्यांची लोकसंख्या ५० टक्क्यांवर आली आहे, असा संघाचा दावा आहे.

हाप की फूल?
पाच वर्षापूर्वी स्वयंसेवकाच्या गणवेश बदलाबाबत चर्चा झाली होती. मात्र, पाच वर्षांनी त्यावर विचार व्हावा, असा निर्णय तेव्हा झाला होता. ५ वर्षांचा कालावधी सरल्याने रांचीच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली. गणवेश बदलाबाबत एक समिती नेमण्यात आली आहे. ही समिती सर्वांची मते आजमावून २०१६ मध्ये राजस्थानातील नागौर येथे होणाऱ्या अधिवेशनात अहवाल मांडणार आहे. त्यानंतरच स्वयंसेवकांची ‘हाप चड्डी, की फुल पँट’ याचा निर्णय होईल, अशी माहिती प्रा. सतीश मोढ यांनी दिली.