आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात संघ स्वयंसेवकाची हत्या; घटनेनंतर तणाव, परिसरात पोलिस बंदोबस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझीपूर- उत्तर प्रदेशातील गाझीपूरजवळील करंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत  शनिवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राजेश मिश्रा (३५) यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. त्यांचे लहान भाऊ अमितेश (३०) गोळी लागून जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. राजेश यांचे बांधकाम क्षेत्राशी संबंधित साधनांचे दुकान आहे. शनिवारी ते लहान बंधू अमितेश यांच्यासोबत सकाळी फिरायला गेले होते. 

त्यानंतर ते दोघे दुकानावर गेले. तेथे आधीपासून दबा धरून बसलेल्या अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला.  या गोळीबारात राजेश जागीच ठार झाले. तर अमितेश गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या लोकांनी अमितेश यांना दवाखान्यात नेले. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून गुंडाच्या अटकेसाठी लोकांनी निदर्शने केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, या परिसरात पाेलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक सोमेन वर्मा यांनी सांगितले, या प्रकरणाची चौकशी सुरू असून हत्येचे कारण समजू शकले नाही. नातेवाइकांकडे चौकशी सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...