आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह जिहाद: बजरंग दलाच्या निशाण्यावर शाळा, मुलींना वाटले जात आहेत पत्रके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधीत बजरंग दलाने उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा लव्ह जिहाद विरोधात आघाडी उघडली आहे. संघटनेचे नेते शाळा-शाळांमध्ये जाऊन पत्रक वाटून हिंदू विद्यार्थिनींना सतर्क राहाण्याचा सल्ला देत आहेत. या पत्रकात हिंदू मुलींनी 'मुस्लिम लव्ह जिहादींना' कसे ओळखायचे, याची विस्तृत माहिती दिली आहे. गेल्या वर्षीही संघटनेने उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद नावाने कार्यक्रम केले होते.
काय आहे पत्रकात
बजरंग दलाने प्रकाशित केलेल्या आणि वाटत असलेल्या पत्रकात लिहिले आहे, की मुस्लिम युवक त्यांचे खरे नाव लपवून हिंदू नावाने वावरतात आणि हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात ओढतात. त्यासाठी ते हातात भगवे धागे आणि गळ्यात देवी-देवतांचे लॉकेट घालतात. श्रीमंत असल्याचा देखावा करतात. त्यासाठी महागड्या गाड्यांमधून फिरत असतात. असा दिखावा करुन हिंदू मुलींना फसवले जाते.
आखाती देशातून पैसा येत असल्याचा आरोप
बजरंग दलाने आरोप केला आहे, की लव्ह जिहादसाठी मुस्लिम तरुणांना आखाती देशांमधून मोठ्या प्रमाणात पैसा येत आहे. त्याच पैशातून हे तरुण महागड्या गाड्या आणि श्रीमंतीचा दाखावा उभा करतात.