आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहार टॉपर्स घोटाळाः स्ट्राँग रूममध्ये आढळली रुबीची गहाळ उत्तरपत्रिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहारटॉपर घोटाळ्यातील कथित टॉपर विद्यार्थिनी रुबी रायची हरवलेली उत्तरपत्रिका अखेर सापडली आहे. ही उत्तरपत्रिका बिहार बोर्डाच्या अधिकाऱ्यांनीच गायब केल्याचा संशय होता; परंतु हा संशय शुक्रवारी दूर झाला. एसआयटी पथकाने बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांसमक्षच मूल्यांकन केंद्राचे सील तोडले. त्यानंतर चौकशी सुरू झाली.

बोर्डाचे पदाधिकारी मूल्यांकन केंद्रावर इंटर आर्ट्सची माजी टॉपर रुबी रॉयची होम सायन्स विषयाची उत्तरपत्रिका शोधण्यासाठी गेले होते. शोधाशोध केल्यानंतर तिचा पेपर मिळाल्याने पदाधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. रुबीची उत्तरपत्रिका हरवल्याचे कळल्यापासून हे प्रकरण चर्चेत होते. शुक्रवारी उपसचिव कामेश्वर गुप्ता एसआयटीच्या सदस्यांसह राजेंद्रनगर बालक विद्यालयामध्ये पोहोचले. हा घोटाळा उघड झाल्यानंतर एसआयटीने हे केंद्र सील केले होते. तपासणी केली असता उत्तरपत्रिका तेथेच आढळल्या.

त्रिकुटाचेमोबाइल डीलिंग : बोर्डाचामाजी अध्यक्ष लालकेश्वर प्रसाद सिंह, त्याची पत्नी प्रो. उषा सिन्हा ‘मास्टरमाइंड’ बच्चा राय हे त्रिकूट मोबाइलवर एकमेकांच्या सतत संपर्कात होते. फेब्रुवारी, मार्चमध्ये इंटरची परीक्षा सुरू झाल्यापासून निकाल लागेपर्यंत या तिघांमध्ये जवळपास १०० वेळा मोबाइलवर बोलणी झाली होती. या प्रकरणातील महत्त्वाचे पात्र असलेल्या या त्रिकुटाच्या मोबाइल डिटेल्स तपासल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली आहे.

४० बँक खात्यांची तपासणी
याप्रकरणात आरोपी लालकेश्वर दांपत्य तसेच बच्चा रायचे बँक खाते आर्थिक व्यवहारांची तपासणी होत आहे. त्यांच्या ४० पेक्षा जास्त बँक खात्यांवरून आर्थिक व्यवहार झाले असून एसआयटीने अधिक तपासासाठी या बँकांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. बच्चा रायने प्रवेश, परीक्षा तसेच निकालापर्यंत घोटाळे करून गेल्या २५ वर्षांत कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...