आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये आर्टस विभागातून टॉपर आलेल्या रुबीची गुणपत्रिकाच गायब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहारमध्ये आर्टस विभागातून टॉपर आलेली रूबी रॉयची इंटर परीक्षेशी संबंधित गुणपत्रिका कार्यालयातून गायब झाली आहे. टॉपर घोटाळ्याचा तपास निर्णायक टप्प्यात पोहोचलेला असताना ही खळबळजनक घटना उघडकीस आल्याने एसआयटीही थक्क झाली आहे.
गुणपत्रिका इंटर कौन्सिलच्या स्ट्राँग रूममध्ये ठेवल्या जातात. त्यावर प्रभारी व्यक्तीची नेमणूक केली जाते. असे असताना ही गुणपत्रिका गायब कशी झाली त्यामागे कुणाचा हात आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाने याप्रकरणी बोर्डाकडे खुलासा मागितला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक चंदन कुशवाहा यांनी सांगितले की, या घोटाळ्यात तसेच गुणपत्रिका गायब प्रकरणी अनेक अधिकारी कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. रूबी रॉयला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली असून इतर टॉपर्सच्या विरोधातही कारवाई सुरू केली आहे.
बातम्या आणखी आहेत...