आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेजारील महिलेची हत्‍या करुन पळाला होता युवक, कपड्यांनी केली पोलखोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुचिता (फाइल फोटो) आणि आरोपी दिव्‍य. - Divya Marathi
रुचिता (फाइल फोटो) आणि आरोपी दिव्‍य.
उदयपूर- 1 डिसेंबर, 2016 रोजी वकील रुचिता यांची हत्‍या झाली होती. याप्रकरणी आरोपी दिव्‍य कोठारी याच्‍याकडून जे कपडे पोलिसांनी ताब्‍यात घेतले होते त्‍यांच्‍यावर रुचिता यांचेच रक्‍ताचे डाग असल्‍याचे आता सिद्ध झाले आहे. तब्‍बल एका वर्षांनंतर आलेल्‍या डीएनएच्‍या अहवालातून ही बाब समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनूसार, हत्‍येनंतर दिव्‍यने रचिता यांचे कपडे नाल्‍यात फेकून दिले होते. त्‍यांना पोलिसांनी ताब्‍यात घेऊन डीएनए तपासणीसाठी पाठवले होते.


दिव्‍य भास्‍करने केला होता प्रथम खुलासा
- 1 डिसेंबर, 2016 रोजी भोपाळ येथील फ्लॅट नं. 702मध्‍ये वकील रुचिता यांची हत्‍या झाली होती. त्‍याचदिवशी रुचिता यांच्‍या फ्लॅटच्‍या वरच्‍या फ्लॅटमध्‍ये (फ्लॅट नं. 802) राहणारा दिव्‍य कोठारीही गायब झाला होता. पोलिसांनी तर रुचिता यांचे पती कृष्‍ण वल्‍लभ गुप्‍ता यांना दोषीही मानले होते. मात्र याचा स्‍वतंत्र तपास करत भास्‍करने दिव्‍यच या प्रकरणी आरोपी असल्‍याचे सर्वप्रथम उघडकीस आणले होते.

- 2 डिसेंबररोजी दिव्‍यने फतहपूरा पोलिस ठाण्‍यात येऊन आपण रुचिता यांना आईसमान मानत असल्‍याचे सांगितले होते.
- रुचिता यांचे वडील दुल्‍लीचंद जैन यांनी आपल्‍या जावयावर म्‍हणजे कृष्‍ण वल्‍लभ गुप्‍ता यांच्‍याविरोधात हत्‍येचा गुन्‍हा दाखल केला होता. त्‍यामुळे त्‍यांना 3 दिवसही तरुंगात घालवावे लागले होते. आपल्‍या पत्‍नीच्‍या अंतिम संस्‍कारातही त्‍यांना सहभागी होता आले नाही.


पागल नव्‍हता आरोपी मुलगा
- 3 डिसेंबररोजी दिव्‍यने आपण हत्‍या केल्‍याचे कबूल केले होते. पोलिसांनी पत्रकारपरिषदेत दिव्‍य पागल असल्‍याचे सांगितले होते. मात्र तपास अधिका-याने याचा इन्‍कार केला होता.
- पोलिसांच्‍या या दाव्‍यावरही भास्‍करने त्‍यांना प्रश्‍न विचारले होते. शेवटी पोलिसांनी हे मान्‍य केले की, तपासात त्‍यांच्‍याकडून चूक झाली आहे. आणि दिव्‍य पागल नसून बौद्धिक दृष्‍टया अगदी ठीकठाक आहे.
- 5 डिसेंबरला पोलिसांनी या प्रकरणाचा पूर्ण खुलासा केला. हा खुलासा भास्‍करने पहिल्‍याचदिवशी केला होता.
- सध्‍या या प्रकरणाची सुनावणी चित्‍तौडगड येथील कोर्टात सुरु आहे. आतापर्यंत 15 सुनावणी झाल्‍या असून पुढील सुनावणी 24 नोव्‍हेंबररोजी आहे.

 

आरोपीचे वकील म्‍हणाले, पोलिसांनी लावले असेल रक्‍त
- नुकत्‍याच हाती आलेल्‍या डीएनए रिपोर्टला पोलिस एक सबळ पुरावा मानता आहे. मात्र आरोपीच्‍या वकीलांनी  म्‍हटले आहे की, पोलिसांना 4 दिवसानंतर रुचिताचे कपडे मिळाले होते. त्‍यांनीच कपड्यावर रुचिताचे रक्‍त लावले असेल.


पुढील स्‍लाइडवर पाहा, या घटनेशी संबंधित फोटोज...


 

बातम्या आणखी आहेत...