आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sex कोडवर्डमध्ये अडकली महिलेची मर्डर मिस्ट्री, आंटीच्या प्रेमात पडला होता आरोपी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्यपूर (राजस्थान) - रुचिता हत्याकांड एका 'टर्टल' अर्थात कासवाभोवती फिरत आहे. हा कासव या हत्याकांडात केवळ मुख्य साक्षीदार नाही तर हत्याकांडाचा कोडवर्ड देखिल आहे. दिव्य कोठारीच रुचिताच्या हत्येचा आरोपी असल्याचा प्रमुख साक्षीदार हा कासव आहे. रुचिताच्या घरात दिव्यने सर्वात आधी या 'टर्टल'चे फोटो मोबाइलमध्ये कैद केले होते. मात्र या 'टर्टल' संबंधीच्या आणखीही कथा समोर येत आहेत. ज्यापद्धतीने सायबर सेक्सच्या व्हर्च्यूअल जगात दिव्य कोठरी बुडालेला होता, त्या जगतातील स्लँग भाषेत 'टर्टल' चा अर्थ अप्राकृतीक सेक्स होतो.
- दिव्य कोठारीला अटक झाली असून पोलिसांनी सुखेर पोलिस स्टेशनमध्ये त्याची कसून चौकशी केली.
- त्यात दिव्यने प्रथमच मान्य केले, की त्याने रुचितासोबत दुष्कर्माचा प्रयत्न केला होता. रुचिताने त्याला कडाडून विरोध केल्यानंतर त्याने टूलबॉक्समधील पान्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला.
- दिव्यने रुचिताला बेडवरही आदळले. तिच्या ओरडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी त्याने उशिने तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. त्याने रिमोटने टीव्हीचा आवाज आधीच वाढवून ठेवला होता.
काय आहे टर्टलचा की-वर्ड
- हा हत्याकांडावर लक्ष्य ठेवून असलेले एक वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणाले, मर्डर मिस्ट्रीमध्ये सर्वात मोठा की-वर्ड टर्टल आहे.
- याचा सर्वसामान्य अर्थ कासव असला तरी व्हर्च्यूअल जगतातील नात्यांमध्ये किंवार स्लँग भाषेत त्याचा अर्थ- 'अ डेव्हिएंट सेक्श्यूअल अॅक्ट' असा होतो.
- अनेक ऑनलाइन इंग्लिंश कथांमध्ये या शब्दाचा प्रयोग दोन व्यक्तींच्या सेक्श्यूअल अॅक्टसाठी होतो.
- त्यामुळे पोलिस अधिकाऱ्याने शंका व्यक्त केली की हत्याकांडात हा शब्द एखाद्या की-वर्ड प्रमाणेही वापरला असेल.
- दिव्यच्या जबाबावरुन या हत्याकांडात अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत, त्यांचाही माग पोलिसांना काढायचा आहे.
एक-एक कडी जोडत आहे पोलिस
- दिव्यने आतापर्यंत दिलेल्या माहितीनुसार, रुचिता आंटी आमच्या घरी नेहमी येत होत्या. दोघांचे फ्लॅट समोरासमोर होते.
- दिव्यने सांगितल्यानुसार, पहिल्याच भेटीत तो रुचिता आंटीच्या प्रेमात पडला होता.
- दिव्य सांगतो, पहिल्या दिवसापासून माझ्या मनात रुचिता आंटीबद्दल आकर्षण होते. मी माझे प्रेम लपवू शकलो नाही.
- मी त्यांच्यासोबत बर्थ डे पार्टीजलाही जात होतो. आम्ही बऱ्याचवेळा डिनरसाठी सोबत बाहेर गेलो होतो.
- त्या माझ्यासोबत बॅडमिंटन खेळायाच्या, योगा करताना तर त्या अधिकच सुंदर दिसत होत्या. आमची संडे पार्टीही सोबत राहात होती.
- रुचिता आंटीबद्दल मला स्ट्राँग अफेक्शन होते.
- त्यांच्या घरात कधीही काही झाले तर त्या मला बोलावून घेत होत्या. त्यांच्याकडील टर्टल सोबत खेळण्यासाठी मी जात होतो, हे तर फक्त निमित्त होते त्यांना भेटण्यासाठीचे...
कॉल लोकेशनने सर्व व्हेरिफाय
- आरोपी दिव्यकडे केलेल्या कडक चौकशीत त्याने सांगितलेल्या प्रत्येक ठिकाणी पोलिस त्याला घेऊन गेले आणि सर्व व्हेरिफाय करुन घेतले.
- ठाणे अंमलदार मांगीलाल म्हणाले, आरोपी दिव्य कोठारीविरोधात बारिकसारिक पुरावे गोळा केले जात आहेत. कारण कोर्टात रुचिता मर्डर केस कुठेही कमी पडायला नको.
सर्वात मोठा पुरावा आरोपीच्या मोबाइलमध्ये
- सोमवारपर्यंत झालेल्या चौकशीत स्पष्ट झाले की आरोपीने पूर्ण शुद्धीत रुचितावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. रुचिताने विरोध केल्यानंतर त्याने तिची हत्या केली.
- आरोपीविरुद्धचा सर्वात मोठा पुरावा त्याच्या मोबाइलमध्ये सापडला आहे. जेव्हा तो रुचिताच्या फ्लॅटमध्ये आला होता, त्याने टर्टलचे फोटो घेतले होते.
- या फोटोवरुनच स्पष्ट होते की आरोपी त्यावेळी पूर्ण शुद्धीत होता आणि घटनेच्यावेळी तो त्या रुममध्ये होता.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...