आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुदासपूर : बॉम्ब सदृष्य वस्तू सापडली, पोलिस घटनास्थळी दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना - सोमवारी दहशतवादाची दाहकता सोसलेल्या पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये बॉम्ब सापडल्याची माहिती आहे. वृत्तवाहिन्यांच्या माहितीनूसार बस स्थानकाजवल बॉम्ब सदृष्य वस्तू सापडली आहे. संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे. बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिस अधीक्षक गुरप्रीतसिंग यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सोमवारी गुरुदासपूर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच पोलिस शहीद झाले होते. 12 तासांच्या धुमश्चक्रीनंतर दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
अधिकाऱ्यांनी सांगितल्यानूसार, एक पाकिट आढळले होते. पाकिटातून तार आणि अँटीना बाहेर आल्याचे दिसत होते. त्यामुळे टाइमबॉम्ब असल्याची प्रत्यक्षदर्शींना शंका आली. पोलिसांनी परिसर रिकामाकरुन बॉम्ब सदृष्य वस्तूभवती मातीने भरलेल्या गोण्या ठेवल्या आहेत. ज्या भागात बॉम्ब सापडला ती अतिशय अरुंद गल्ली आहे. एकावेळी तेथून फक्त तीन जण जाऊ शकतात. पोलिस अधीक्षकांनी लष्करालाही घटनेची माहिची कळविली आहे. गरज पडल्यास त्यांची मदत घेतली जाईल.