आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG मध्यरात्री महिलांचे केस कापून नेतेय कुणीतरी; पोलिसही हैराण, पण छडा काही लागेना...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झोपलेल्या महिलांचे केस कापण्याच्या घटना खूप वाढल्या आहेत. - Divya Marathi
झोपलेल्या महिलांचे केस कापण्याच्या घटना खूप वाढल्या आहेत.
जोधपूर (राजस्थान) - जोधपूरच्या फलोदी परिसरातील गावात रात्रीबेरात्री झोपलेल्या महिलांचे केस कापण्याच्या घटना खूप वाढल्या आहेत. हे प्रकरण तसे मजेशीर पण तितकेच खूप गंभीरही आहे. कारण कित्येक दिवसांपासून पोलिसांना याचा छडा काही केल्या लागत नाहीये. वर यात अफवा आणि अंधश्रद्धेनेही कडेलोट केला. बुवाबाबा, वैदूंनी अशा घटनांत झाडपाला देऊन बक्कळ कमाई सुरू केली आहे. पोलिस या घटनांबद्दल अद्याप कोणताही खुलासा करू शकलेले नाहीत. काही दिवस आधीच पोलिस अधीक्षकांनी यासंबंधी फलोदीमध्ये बैठक घेतली होती. यानंतर एएसपी म्हणाले की, लवकरच पूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला जाईल.
 
चकित करणाऱ्या बाबी आल्या समोर...
गावकऱ्यांना पोलिसांच्या तपासाची प्रतीक्षा आहे. यादरम्यान चकित करणाऱ्या बाबी समोर आल्या आहेत. लोहावटमध्ये शुक्रवारी दोन घटना समोर आल्या. यात एका महिलेला पोलिसांनी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी ती मानसिक रुग्ण असल्याचे सांगितले. दुसऱ्या महिलेला नातेवाइकांनी दवाखान्यात नेले असता तिने डॉक्टरांना सांगितले की, तिचा नवरा महिनाभरापासून घरी येत नव्हता. म्हणून तिने स्वत:च आपले केस कापले.
 
वैदू म्हणाला, देवाच्या कोपामुळे होताहेत अशा घटना..
- सर्वात आधी ज्या मुलीचे केस कापण्यात आले होते, तिचे एका आठवड्यानेच पुन्हा एकदा केस कापण्यात आले. यानंतर पोलिसांनी पलिना येथील एका भोप्याला (राजस्थानातील वैदू) अशा घटनांबाबत विचारण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलावले. तिथे चौकशीदरम्यान तो म्हणाला, देवाच्या कोपामुळेच या घटना घडत आहेत. त्याने त्या मुलीच्या घरी देवाची मूर्ती स्थापन केली आहे. यानंतर केस कापले जाणार नाहीत अशी हमीही दिली आहे. शुक्रवारी अर्धा डझन अशा घटना समोर आल्या. यासंदर्भात पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवता मनोचिकित्सकांचा सल्ला घेण्याचेही आवाहन केले आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा या घटनेचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...