आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्किन बाँड यांच्या भेटीसाठी लागतात रांगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मसुरी - उत्तराखंडच्या प्रेक्षणीय हिल स्टेशनपैकी मसुरी एक असून पर्यटकांचे हे आवडीचे ठिकाण आहे. माल रोडस्थित केंब्रिज बुक डेपोच्या बाहेर दर शनिवारी लंच टाइमनंतर साहित्यप्रेमींची रीघ लागते. यात बहुतांश तरुण असतात. मात्र, लहान मुले व वयोवृद्धांची संख्याही मोठी आहे. तेथे ८२ वर्षीय गोरीपान व्यक्ती येताच लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आेसंडून वाहतो. ती व्यक्ती खुर्चीत बसताच त्यांच्या पुस्तकांवर स्वाक्षरी घेण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडते. त्यांच्यासोबत छायाचित्र काढून घेण्यासही नवी पिढी उत्सुक असते. हे लेखक म्हणजे ब्रिटिशवंशीय भारतीय लेखक रस्किन बाँड. त्यांना भेटण्यासाठी येणारे त्यांच्यासाठी फुले, मिठाई आणि भेटवस्तू आणतात. एखाद्या लेखकाविषयी वाचकांचे प्रेम पाहण्याची अशी संधी भारतात दुर्मिळच. ही भेटीची रीत गेल्या १८ वर्षांपासून सुरू आहे.
मुंबईहून आलेली २२ वर्षीय तरुणी शशिकला बेंद्रे सांगते, ‘मी रस्किन यांना भेटण्यासाठीच मसुरीला आले आहे. त्यांचे लेखन मला आवडते. त्यांच्या भेटीमुळे माझा प्रवास सफल झाला.’ मध्य प्रदेशातील विदिशाहून आलेले अग्रवाल कुटुंबीयही त्यांचे चाहते आहेत. मनहर अग्रवाल सांगतात, ‘मसुरीचे दुकानदार, रिक्षावाले, कुली रस्किन यांना आेळखतात.’ सगळ्यांना त्यांच्या घराचा पत्ता पाठ आहे. हरियाणातील रोहतक जिल्ह्यातून आलेल्या केशव चौधरींनी सांगितले की बाँड यांनी त्यांच्याशी हिंदीतून संभाषण केले. तेथे उपस्थित एका मुलाशी ते गढवालीत बोलत होते. स्वत:विषयी बाँड सांगतात, ‘भारतात जन्म झाल्याचा अभिमान वाटतो. माझे वाचक मला इतके प्रेम देतील याची कल्पनाही केली नव्हती.’ उदयपूरहून बाँड यांना भेटण्यासाठी आलेले ६४ वर्षीय जयराम यांनी सांगितले की, गेल्या ३० वर्षांपासून रस्किन बाँड यांच्या साहित्याचे ते वाचक आहेत. या पुस्तक दालनाचे मालक सुरिंदर अरोरा सांगतात, ‘येथे बाँड यांच्या चाहत्यांची खूप गर्दी होते. कधी कधी तर गर्दी नियंत्रित करणे कठीण होऊन जाते.’ मसुरीला येणारे पर्यटक रस्किन यांना शोधत आमच्याकडे येतात. ते केवळ शनिवारीच भेटतात असे सांगितल्यावर ते तोपर्यंत थांबण्यासही तयार असतात, असे अरोरा सांगतात. ज्यांना लवकर जाणे अनिवार्य असते ते मात्र उदास होतात. अनेक पर्यटक त्यांच्या भेटीसाठी प्रवासाचे वेळापत्रक बदलतात. रस्किन यांचा जन्म १९३४ मध्ये हिमाचल प्रदेशच्या कसौली गावात झाला. त्यांचे पालनपोषण जामनगर, डेहराडून, नवी दिल्ली, शिमल्यात झाले. १९९३ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, १९९९ मध्ये पद्मश्री, २०१४ मध्ये पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले
बातम्या आणखी आहेत...