आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्यासह रशियन महिलेचा न्यायासाठी लढा, CM अखिलेश यांनी केली अशी मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सासू दहा लाख रुपये हुंडा मागत असल्याचा आरोप करत घरासमोरच धरणे देणारी रशियन महिला व तिचा तीन वर्षांचा मुलगा. - Divya Marathi
सासू दहा लाख रुपये हुंडा मागत असल्याचा आरोप करत घरासमोरच धरणे देणारी रशियन महिला व तिचा तीन वर्षांचा मुलगा.
नवी दिल्ली/ आग्रा - सुषमा स्वराज यांच्या एका ट्विटनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एका रशियन महिलेची मदत केली आहे. ही महिला सासरच्या मंडळींविरुद्ध घरासमोरच धरणे आंदोलन करत होती. सासरचे लोक हुंड्याचा तगादा लावत असल्याने रशियन सून तिच्या तीन वर्षांच्या मुलासह घराबाहेर बसली होती. मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर सासूने सांगितले की हे प्रकरण हुंड्याचे नसून दोन संस्कृतींमधील भिन्नतेमुळे वाद झाला होता.
अखिलेश यादवांनी केले काउन्सलिंग
- रशियन युवती ओल्गा एफिमेनकोव्हाने 2011 मध्ये विक्रांतसिंह चंदेलसोबत आग्रा येथे लग्न केले होते.
- ओल्गा - विक्रांत आणि मुलासह गोव्याला राहाते. शनिवारपासून ओल्गा इंद्रपूरी येथील तिच्या सासूच्या घराबाहेर धरणे देत होती.
- झाले असे की व्यवसायात तोटा झाल्याने ओल्गा गोवा सोडून आग्रा येथे आली होती. मात्र विक्रांतच्या कुटुंबीयांनी या जोडप्याला घरात घेण्यास नकार दिला.
- आरोप आहे की विक्रांतची आई निर्मला चंदेल यांनी सर्व संपत्ती मुलीच्या नावे केली आहे. ती आग्रा येथेच एक शाळा चालवते.
- कुटुंबाच्या संपत्तीवर माझ्या पतीचाही हक्क आहे, त्याला त्याचा हिस्सा मिळाला पाहिजे अशी मागणी ओल्गाने केली होती.
- त्यासोबतच तिने आरोप केला होता की सासू 10 लाख रुपये हुंडा मागत आहे. त्यामुळेच विक्रांत, आणि तीन वर्षांच्या मुलासह सासू आम्हाला घरात येऊ देत नाही.

माध्यमांमध्ये चर्चा झाल्यानंतर सुषमांचे ट्विट, अखिलेश यादवांनी केली मदत
- केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या प्रकरणी रविवारी ट्विट केले- अखिलेशजी कृपया या महिलेची मदत करा.
- त्या ट्विटला प्रत्युत्तर देत अखिलेश यांनी मदतीचे आश्वासन दिले.
- त्यानंतर रविवारी उशिरा रात्री अखिलेश यांनी ट्विट केले की, - सासरच्या लोकांचे काउन्सलिंग केल्यानंतर आता रशियन महिला तिच्या कुटुंबासोबत आहे.
- या ट्विटसोबत सीएम ऑफिसने रशियन महिलेचा सासूसोबतचा फोटो देखील ट्विट केला.
- त्यावर स्वराज यांनी हे प्रकरण तातडीने सोडवल्याबद्दल मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे आभार व्यक्त केले. त्यासोबतच म्हटले की अशा घटनांमुळे देशाचे नाव खऱाब होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, धरणे देणारी रशियन महिला आणि सीएमओने सासू-सुनते समेट घडवल्यानंतरचा फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...