आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Russian Girl Fall In Love With Boy From Haryana India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FB LOVE: हरियाणवी छोऱ्यासाठी देश सोडून आली रशियन प्रेमिका, करते चुलीवर स्वयंपाक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुरूक्षेत्र - प्रेमासाठी साता समुद्र ओलांडणेही कठीण नसते असे म्हटले जाते. त्यात फेसबूकद्वारे जडलेल्या प्रेमाला तर कोणत्याही देशाच्या किंवा इतर सीमा नसतात. असाच प्रकार जुलै महिन्यात हरियाणात समोर आला होता. फेसबूकवर जडलेल्या प्रेमानंतर एक रशियन मुलगी देश आणि कुटुंब सोडून भारतात आली आणि तिने याठिकाणचे राहणीमानही अवगत केले.
विक्रमच्या आजीबरोबर इवगिनिया पेट्रोव्हा आणि विक्रम.
4 फेब्रुवारीला फेसबूकचा स्थापना दिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने आम्ही तुम्हाला फेसबूकच्या माध्यमातून जुळलेल्या love Stories बाबत माहिती देत आहोत.

अशीच एक love Storie आहे हरियाणाचा विक्रम आणि रशियाची इवगिनिया पेट्रोव्हा यांची. जुलै 2014 मध्ये इवगिनिया पेट्रोव्हा प्रेमासाठी भारतात आली होती. हरियाणाच्या कुरुक्षेत्र मधील बेरथली येथे राहणाऱ्या विक्रम बरोबर आठ महिन्यांपूर्वी तीची फेसबूकवर मैत्री झाली होती आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. पेट्रोव्हाला भारतीय संस्कृतीही भावली आणि तिने हिंदु पद्धतीने विवाह करण्याचा निर्णयही घेतला.

विक्रम अमृतसरमध्ये करतो जॉब
विक्रम अमृतसरमध्ये एका बाल रोग तज्ज्ञाकडे सहायक म्हणून काम करतो. त्याचे वडील राम कुमार जगाधरी कोर्टात आहेत. विक्रमने सांगितले की, 2009 मध्ये त्याने फेसबूक अकाउंट सुरू केले होते. अमृतसरमध्ये गेल्यानंतर त्याला मित्रांची कमतरता जाणवत होती. त्यावेळी त्याने पेट्रोव्हाला फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवली. तिने ती स्वीकारली. त्यानंतर त्यांच्यात चॅटिंग सुरू झाली व पुढे प्रेम जडले.

इशाऱ्यांवर समजते सर्व
विक्रमच्या नातेवाईकांनीही या परदेशी कन्येला सुनेच्या रुपात स्वीकारले आहे. हिंदु पद्धतीने विवाह होणार असला तरी रशियन पद्धतींचा विचार करणार असल्याचे, विक्रमच्या आईने म्हटले आहे. पेट्रोव्हाची भाषा समजत नसली तरी इशाऱ्यांनी बोलत असल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे.

पैट्रोव्हाचे कुटुंबीयही होते तयार
पेट्रोव्हा जुलैमध्ये कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी भारतात आली होती. त्यावेळी तिने विक्रमच्या कुटुंबीयांबरोबरही वेळ घालवला. यावेळी तिने ग्रामीण राहणीमान शिकण्याचाही प्रयत्न केला. विशेष म्हणजे इवगिनियाचे कुटुंबीयही तिच्या या निर्णयाने आनंदी होते.

इवगिनियाला भावली भारतीय संस्कृती
इवगिनियाने एका मुलाखतीत हे मान्य केले होते की, भारताच्या संस्कृतीने तिचे मन जिंकले आहे. रशिया आणि भारताच्या संस्कृती पूर्णपणे वेगळ्या आहेत. पण तरी भारतीय संस्कृती आत्मसात करण्याचे तिने ठरवले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इवगिनिया जेव्हा भारतात आली होती त्यावेळचे काही PHOTOS...