आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिक्स समिटसाठी पुतीन भारतात, भारत-रशियात एस-400 डिफेन्स सिस्टिम खरेदी करार?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी- गोव्यात शनिवारी होणार्‍या ब्रिक्‍स संमेलनात रशियाचे राष्‍ट्राध्यक्ष व्‍लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्‍ट्राध्यक्ष शी जिनपिंग सहभागी होणार आहेत. व्लादिमीर पुतीन भारतात दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात यावेळी द्विपक्षीय चर्चा होणार असून दोन्ही देशांमध्ये काही महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे.

भारत, रशियाकडून एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टिम आणि 200 कामोव हेलिकॉप्टर खरेदी करु शकते. एस-400 हे तब्बल 39 हजार कोटी रुपयांचे तंत्रज्ञान असल्याचे समजते. याद्वारे शत्रूची शेकडो किलोमीटर अंतरावरची मिसाईल्स पाडता येऊ शकते. तसेच शत्रूच्या जहाजांनाही लक्ष्य करता येऊ शकते.

त्याचप्रमाणे, नरेंद्र मोदी सोमवारी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष मिचेल टेमर यांच्यात द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर मोदी दक्षिण आफ्रीका, भूतान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंकेच्या नेत्यांशी चर्चा करती‍ल. तसेच 16 ऑक्टोबरला भारतात येणार्‍या म्यानमारच्या परराष्ट्रमंत्री आंग सान सू यांची मोदी भेट घेतील.

पुढील स्लाइडवर वाचा, कसे कार्य करते एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टिम...
बातम्या आणखी आहेत...