आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायन CEO, कुटुंबियांना HC कडून एक दिवसाचा दिलासा; हरियाणा पोलिस मुबंईत दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेयानचे संस्थापक संचालक ऑगस्टिन पिंटो. - Divya Marathi
रेयानचे संस्थापक संचालक ऑगस्टिन पिंटो.
गुडगाव/मुंबई - रायन इंटरनॅशनल स्कूलचे सीईओ रायन पिंटो, ऑगस्टीन पिंटो आणि ग्रेस यांची अटक उद्यापर्यंत टळली आहे. महाराष्ट्र सरकारने पिंटो परिवाराच्या विरोधातील याचिकेच्या तयारीसाठी एक दिवसाची मुदत मागितली आहे. हरियाणा पोलिसांचे एक पथक रायनच्या संचालकांच्या चौकशीसाठी मुंबईत आले आहे. दुसरीकडे, रायन ग्रुपच्या कांदिवली शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर तीव्र निदर्शने केली. 
 
अटकपूर्व जामीनासाठी मुंबई हायकोर्टात धाव
- रायनचे मुख्य प्रशासकीय अधिकारी (सीईओ) रायन पिंटो आणि त्याचे आई-वडील ग्रेस आणि ऑगस्टीन यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई हायकोर्टात सोमवारी अर्ज केला होता. 
- रायनचे वडील ऑगस्टीन आणि आई ग्रेसी हे सेंट झेव्हियर एज्यूकेशन ट्रस्टचे विश्वस्त आहेत. रेयान ग्रुपच्या देश-विदेशातील शाळांवर तेच देखरेख ठेवून आहेत. 
 
प्लास्टिक कंपनीत कामगार ते रेयान ग्रुपचे संचालक
- मुळचे कर्नाटकातील ऑगस्टीन हे प्लास्टिक कंपनीत कामगार म्हणून काम करत होते. मूळचे कर्नाटकातील ऑगस्टीन हे एका व्यक्तीच्या शिफारशीवर मुंबईतील मलाड येथील एका शाळेत शिक्षक म्हणून लागले. 
- त्याच शाळेतील गणिताच्या शिक्षिका ग्रेस एलबुबर्क यांच्यासोबत 1974 मध्ये त्यांनी विवाह केला. 
 
10 हजार रुपयांत सुरु केली शाळा 
- त्यानंतर दोघांनी 1976 मध्ये 10 हजार रुपये गुंतवणूक करुन बोरिवली येथे शाळा सुरु केली. मात्र त्यांचा हा प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही आणि शाळा बंद पडली. 
- 1983 मध्ये त्यांनी पुन्हा बोरिवली येथेच सेंट झेव्हियर हायस्कूल नावाने शाळा सुरु केली. त्यानंतर या जोडीने मागे वळून पाहिले नाही. 
- ग्रेस आता मॅडम ग्रेस पिंटो नावाने ओळखल्या जातात, त्या रेयान ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टर आहे. त्यांचा मुलगा रायन सीईओ आहे. हा ग्रुप पूर्णपणे कॉर्पोरेट स्टाइलने काम करतो. 
- रायन ग्रुपच्या देशभरात 130 पेक्षा जास्त शाळा आहे. ग्रुपचे सीईओ रायन यांनी लंडनच्या बिझनेस स्कूलमधून बिझनेस मॅनेजमेंट केले आहे. 
- रायनच्या दोन बहिणी आहेत स्नेहल आणि सोनल पिंटो. दोघीही शिक्षण क्षेत्रातच कार्यरत असून फॅमिली बिझनेसमध्ये आहेत. 
- काही दिवसांपूर्वी ग्रेस पिंटोंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली होती.  
बातम्या आणखी आहेत...