आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • S Anitha Challenged Neet Order Supreme Court Commits Suicide, Father Rised Question

NEET विरोधात लढणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या, माझ्या मुलीने काय चुकीचे केले होते? वडिलांचा प्रश्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिता अतिशय गरीब कुटुंबातील होती. तिचे वडील मजुरी करतात. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
अनिता अतिशय गरीब कुटुंबातील होती. तिचे वडील मजुरी करतात. (संग्रहित फोटो)
चेन्नई- सुप्रीम कोर्टात NEET विरोधात याचिका दाखल करणाऱ्या दलित विद्यार्थिनी एस. अनिताच्या आत्महत्येनंतर तिच्या वडिलांनी आता प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले आहे की माझ्या मुलीने काय चुकीचे केले होते, जे झाले त्याचे उत्तर कोण देणार? शुक्रवारी अनिताने आत्महत्या केली होती. अनिताने कुझुमुर या गावात गळफास घेत आत्महत्या केली होती. ती अतिशय गरीब कुटुंबातून आली होती. तिचे वडील मजुरी करतात.
 
सरकारने केली 7 लाखाची मदत
- अनिताच्या वडिलांनी सांगितले की, अनिताने अतिशय कठीण परिस्थितीत शिक्षण घेतले होते. ती NEET मुळे चिंतेत होती. तिने काय चुकीचे केले, याचे उत्तर कोण देणार?
- अनिताच्या आत्महत्येनंतर तामिळनाडू सरकारने तिच्या घरच्यांना 7 लाखाची मदत केली आहे.
- सुप्रीम कोर्टाने 9 दिवसापूर्वी तामिळनाडू सरकारला मेडिकल प्रवेशासाठी NEET लागू करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी 5 सप्टेंबरपर्यंत काउंसिलिंग पूर्ण करण्यास सांगितले होते.

12 वीत मिळाले होते अनिताला चांगले गुण
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एस. अनिताने शुक्रवारी गळफास घेत आत्महत्या केली होती. अनिताला 12 वीत 1200 पैकी 1176 गुण मिळाले होते. तिने मेडिकलसाठी 196.75 आणि  इंजीनियरिंगसाठी 199.75 गुण मिळवले होते.
- या आधारावर तिला मद्रास इंस्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये एरोनॉटिकल इंजीनियरिंगला प्रवेश मिळाला होता. याशिवाय तिची वेटेरिनरी कॉलेजमध्येही निवड झाली होती. परंतु तिला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याची व डॉक्टर होण्याची इच्छा होती. मात्र तिला सीबीएससी अभ्यासक्रमावर आधारित NEET मध्ये 700 पैकी फक्त 86 गुण मिळाले होते. 
- मेडिकलला प्रवेश न मिळाल्याने तिने हे पाऊल उचलले.

काय आहे प्रकरण?
- केंद्र सरकारने तामिळनाडूला एक वर्ष NEET मधुन बाहेर ठेवले होते. त्यानंतर राज्य सरकारने एका ठरावाद्वारे या परिक्षेपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता.
- त्यानंतर केंद्र सरकारचे अटॉर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी राज्य सरकारला हा ठराव वैध नसल्याचे सांगितले होते. सुप्रीम कोर्टानेही राज्य सरकारला सांगितले की, NEET नुसारच वैद्यकीय प्रवेश करावेत.
- केंद्र सरकारच्या या निर्णयाने वैद्यकीय शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्याच्या आशेवर पाणी पडले. 

सुप्रीम कोर्टात दाखल केली होती याचिका
- अनिताने तामिळनाडूतील नीटविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. अनिताला राज्य सरकारच्या नियमानूसार मेडिकलला प्रवेश मिळाला असता कारण तिला कट-ऑफपेक्षा 2 गुण जास्त होते.
- NEET लागू झाल्याने तिला कमी गुण मिळाले होते आणि तिचे मेडिकलचे स्वप्न भंग पावले होते.
बातम्या आणखी आहेत...