आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saarda Scam, Kunal Ghosh Demands Arrest Of Accused

शारदा घोटाळा : आरोपींना अटक करा, खासदार कुणाल घोष यांची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - शारदा घोटाळ्यात सहभागी आरोपी बिनधास्त बाहेर फिरत आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार कुणाल घोष यांनी शनिवारी केली आहे.

या घोटाळ्यातील आरोपी असलेले घोष यांनी शुक्रवारी सकाळी प्रेसिडेन्सी तुरुंगात ५० पेक्षा जास्त झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घोष यांना ऑक्सिजन मास्क लावून येथील एसएसकेएम रुग्णालयातून बांगूर इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजीमध्ये नेण्यात आलेे. त्या वेळी त्यांनी माध्यमांसमोर ही मागणी केली. घोष यांना रविवारी किंवा सोमवारी रुग्णालयातून सुटी देण्यात येईल. त्यांना मागच्या वर्षी २३ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते प्रेसिडेन्सी रुग्णालयातच आहेत. सीबीआयने पुढील तीन दिवसांत अन्य आरोपींना अटक केली नाही, तर आत्महत्या करून घेईल, अशी धमकी घोष यांनी १० नोव्हेंबर रोजी न्यायालयात दिली होती.
पत्रकार आणि पोलिसांत बाचाबाची
कुणाल घोष यांना एसएसकेएम रुग्णालयात नेले जात असताना पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पत्रकारांना त्यांच्याजवळ जाण्यास मनाई केली. यावरून पोलिस आणि पत्रकारांमध्ये बाचाबाची झाली. दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे डीसीपी मुरलीधर शर्मा यांनी सांगितले.