आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin And Rekha Are Only For Timepass In Rajyasabha

सचिन, रेखा राज्यसभेत केवळ टाइमपाससाठी, शॉटगन सिन्हांचा हल्लाबोल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - आपल्या वक्तव्यांवरून वरचेवर चर्चेत राहणारे शत्रुघ्न सिन्हा यांनी सोमवारी रेखा आणि सचिन तेंडुलकर यांच्यावर हल्ला चढवला. सचिन आणि रेखा यांना केवळ टाइमपाससाठी राज्यसभेत आणण्यात आले असल्याचे सिन्हा म्हणाले. जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यांच्यावरही टीका...
- स्पीक्स सेशनमध्ये सिन्हा काँग्रेस नेते शशि थरूर आणि लेखक सुहेल सेठ यांच्यासह चर्चेत सहभागी झाले होते.
- माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा यांची राज्यसभेत अगदी कमी उपस्थिती असली तरी चालते, मात्र कॉलेजमध्ये 60 टक्क्यापेक्षा कमी हजेरी असेल तर विद्यार्थ्यांना परीक्षा देऊ देत नाहीत, असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला होता.
- या प्रश्नावर जोरात हसल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, या सेलिब्रिटींना केवळ टाइमपास म्हणून राज्यसभेत आणण्यात काय अर्थ आहे. पूर्वीपासूनच हे चालत आले आहे. पूर्वी एमएफ हुसेन यांना आणले होते. आता सचिन आणि रेखा आहेत.
- सचिन आणि रेखा यांना यूपीए सरकारच्या कार्यकाळात राज्यसभेत मेंबर बनवण्यात आले होते.

मी दडपशाहीच्या फेजमध्ये..
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, यश मिळण्यापूर्वी तुम्हाला सर्व गोष्टी सहन कराव्या लागतात. उपहास, दुर्लक्ष, तिरस्कार आणि दडपशाही अशा चारही बाबींचा सामना करावा लागतो. त्यानंतर सगळे तुम्हाना सन्मान देऊ लागतात. मी सध्या अखेरच्या टप्प्यात आहे, असे वाटत असल्याचे यावेळी बोलताना सिन्हा म्हणाले.

खामोश....
शत्रुघ्न सिन्हा यांनी फेस्टीव्हल दरम्यान तरुणांचे मनोधैर्य चांगलेच वाढवले. शेर ऐकवले. वैवाहिक आणि बिगर वैवाहिक जीवनावर चिमटेही काढले. राजकारणावरही बोलले आणि जाता जाता खामोश म्हणायलाही ते विसरले नाहीत...
पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS