आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनमध्ये झाली होती सचिन-साराची पहिली भेट, सासऱ्यांचा होता लग्नाला विरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्थानातील दिग्गज गुर्जर नेते खासदार सचिन पायलट यांचा 7 सप्टेंबर रोजी 38 वा वाढदिवस आहे. वडील राजेश पायलट यांच्याकडून वारशाने मिळालेले राजकीय नेतृत्व सिद्ध करण्यात सचिन यशस्वी झाले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमीत्त divyamarathi.com त्यांच्या आयुष्यातील फारशा माहित नसलेल्या घटनांची माहिती करुन देत आहे. जाणून घेऊ या सचिन पायलट यांची LOVE STORY
अजमेर - प्रसिद्ध काँग्रेस नेते राजेश पायलट यांचे चिरंजीव सचिन पायलट यांची प्रेम कथा पूर्ण फिल्मी आहे. कारण सचिन पायलट आणि त्यांची पत्नी सारा यांची पहिली भेट विदेशात शिक्षण घेत असताना झाली आणि तिथेच त्यांचे प्रेम बहरले नंतर त्यांनी लग्न केले. मात्र हे जेवढे वाचायले सहज आणि सरळ होते तेवढा त्यांचा लग्नापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा एका नव्या संकटालाच निमंत्रण देण्यासारखे होते. या दोघांनी आपापल्या कुटुंबियांना लग्नाबद्दल विचारणा केली तेव्हा कहर माजला होता.
मुलगा एका दिग्गज राजकीय नेत्याचा चिरंजीव तर, मुलगी देखील तशाच कुटुंबातून आली होती. तिच्या घरात एक-दोन नाही तर तीन-तीन मुख्यमंत्री होते. सारा मुलगी आहे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची. तर तिचे बंधु देखील जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. अब्दुलांच्या साराने 2004 मध्ये सचिन पायलटसोबत विवाह केला. त्यावेळी साराचे कुटुंब या लग्नाच्या विरोधात होते. आज सचिन देशातली सर्वात तरुण खासदार म्हणून गौरवले जातात.
पुढील स्लाइडमध्ये, सचिन खासदार झाल्यानतंर आब्दुल्लांनी स्विकारले
बातम्या आणखी आहेत...