आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचंदीगड - क्रिकेटचा देव समजल्या जाणा-या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला हनुमानाच्या रुपात दाखवणे एका इंग्रजी वृत्तपत्राच्या अंगलट आले असून सचिनसाठीही त्रासदायक ठरले आहे.
बुधवारी सचिन तेंडुलकरचा 40 वा वाढदिवस होता, त्यानिमीत्त चंदीगडच्या एका इंग्रजी दैनिकाने हनुमानाच्या वेशभुषेतील सचिनच्या फोटोसमोर त्याचे चाहाते त्याला प्रसाद देत असल्याचे दाखवले आहे. या विरोधात येथील स्थानिक न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.
अॅड. अरविंद ठाकूर आणि शिवमुर्ती यादव यांनी वृत्तपत्र आणि सचिन तेंडुलकर यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर चंदिगड जिल्हा न्यायालयाचे न्यायाधिश परवेश सिंगला यांनी साक्ष नोंदवण्यासाठी 8 मे ही तारीख दिली आहे.
याचिकाकर्त्यांनी सचिन तेंडुलकर रामायणातील एखादे पात्र आहे का? की, त्याने कधी रामलीलेत हनुमानाची भूमिका केली आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.
दुसरीकडे, अलाहाबाद येथील सचिनच्या चाहत्यांनी हनुमानाच्या तस्वीरीवर सचिनचा चेहरा लावून त्याला प्रसाद देखील दाखवला. या कृत्यावर भटिंडा येथील हनुमान सेवा या धार्मिक संस्थेने आक्षेप घेत तीव्र विरोध व्यक्त केला आहे. समितीचे प्रमुख सोहन माहेश्वरी म्हणाले, सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या माध्यमातून भारताचे नाव जगात गाजवले आहे. मात्र, त्याची तुलना हुनमानाशी करणे चुकीचे आहे. असे करणा-यांविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी समितीने केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.