आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सरग्रस्त मुलांसाठी सचिनचा पुढाकार, अॅस्टर डीएम फाउंडेशनसोबत सचिनची भागीदारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोची- कॅन्सर आणि हृदयाशी संबंधित आजाराशी लढा देणाऱ्या मुलांना मदतीचा हात देण्यासाठी सचिन तेंडुलकरने पुढाकार घेतला आहे. अॅस्टर डीएम फाउंडेशनने सचिनने या उपक्रमासाठी आपल्याशी भागीदारी केली असल्याची घोषणा केली आहे.  प्रत्येक वर्षी १८ वर्षांखालील ५०  मुलांना उपचारासाठी ही मदत दिली जाणार आहे. 

या योजनेमध्ये अॅस्टर डीएम फाउंडेशन हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया तसेच कॅन्सरवरील उपचारासाठी निधी उपलब्ध करून देईल. यामध्ये रुग्णाच्या कुटुंबीयांना अतिशय कमी खर्च करावा लागेल. प्राथमिक टप्प्यात ही योजना चार वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे. कोची, कालिकत आणि बंगळुरू येथील अॅस्टरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेमुळे एका आदर्श उपक्रमात सहभागी होऊन गरजू मुलांना मदत उपलब्ध करून देण्याची संधी मिळाली असल्याचे तेंडुलकरने यावेळी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...