आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sadhu Cuts Private Part After Alleagetion On Asaram Bapu

आसारामवर लैंगिक शोषणाच्‍या आरोपांनी व्‍यथित साधूने कापले स्‍वतःचे गुप्‍तांग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेठी- आसाराम बापूंवर लैंगिक शोषणाचे आरोप लागल्‍यानंतर व्‍यथित झालेल्‍या एका साधुने स्‍वतःच्याच गुप्‍तांगावर कु-हाडीने वार केले. हा प्रकार उत्तर प्रदेशातील गौरीगंज भागातील माधवपूर गावात घडला आहे. या साधूला गंभीर अवस्‍थेत रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे.

बाबा प्रेमदास असे या साधूचे नाव आहे. त्‍यांच्‍या भक्तांनी सांगितले, की आसाराम बापूंवर लैंगिक शोषणाचे आरोप लागल्‍यापासून साधू बाबा दुःखी झाले होते. बुधवारी त्‍यांचा संयम संपला. त्‍यांनी गुप्‍तांगावर वार केले. याची माहिती मिळताच त्‍यांना रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. त्‍यांची प्रकृती अतिशय गंभीर असून उपचार करण्‍यात येत आहेत. पोलिसांनी मात्र अशा घटनेची माहिती नसल्‍याचे सांगितले आहे.