आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sadhu Yadav To Contest Against Sister Rabri Devi From Saran

परिवार WAR: लालूंची पत्नी राबडीदवींच्या विरोधात मेव्हणे साधू यादव उतरणार रिंगणात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना जवळच्या नेत्यांच्या बंडखोरीला सामोरे जावे लागले. आता घरातच बंडखोरी झाली आहे. त्यांचे मेव्हणे अनिरुद्ध ऊर्फ साधू यादव यांनी सारण येथून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. येथून लालू यादव यांच्या पत्नी आणि साधू यादव यांची बहिण राबडीदेवी राजदच्या उमेदवार आहेत. लालू प्साद आणि राबडी यांचे म्हणणे आहे, की साधू यादवच्या बंडखोरीने काहीही फरक पडणार नाही. फार पूर्वीपासूनच साधू आमच्यापासून दूर गेला होता.
साधू यादव
साधू यादव यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीतच राजदकडून तिकीट न मिळाल्यामुळे काँग्रेसच्या वळचणीला गेले होते. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली मात्र, ते विजयी होऊ शकले नाही. या निवडणुकीच्या कित्येक दिवस आधी त्यांनी राजकीय पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला होता. मध्यंतरी त्यांनी भाजपमध्येही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथेही त्यांची डाळ शिजली नाही. आणखी एका पक्षाकडून त्यांनी तिकीट मिळविण्याचा प्रयत्न केला त्यातही अपयश आल्यानंतर आता त्यांनी अपक्ष लढण्याचा निश्चय केला आहे.