आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साध्‍वी बनलेल्‍या 21 वर्षीय तरुणीचे समोर आले असे रुप, पाहुन व्‍हाल आश्‍चर्यचकित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साध्‍वी बनण्‍यापूर्वीचा आणि नंतरचा दिपिकाचा फोटो. - Divya Marathi
साध्‍वी बनण्‍यापूर्वीचा आणि नंतरचा दिपिकाचा फोटो.
इंदौर- खेल प्रशालामध्‍ये गुरुवारी 10 राज्‍यांतील 4 हजार श्रावक-श्राविकांच्‍या उपस्थितीत जैनेश्‍वरी दीक्षा समारंभ पार पडला. या भव्‍य समारंभामध्‍ये आचार्य शिवमुनी यांच्‍या उपस्थितीत 21 वर्षीय तरुणी दिपिका जैनने सांसारिक जीवनाचा त्‍याग करत साध्‍वीची दिक्षा घेतली. कालपर्यंत मोबाईल, लॅपटॉप चालवणारी दिपीका आता कमंडल, पात्र घेऊन बाकीचे जीवन व्‍यतीत करणार आहे.

सर्वात छोटी साध्‍वी दिव्‍यांशी श्रीजी आहे
- दीक्षा घेण्‍यापूर्वी दिपिकाची भव्‍य शोभायात्रा काढण्‍यात आली होती. त्‍यानंतर प्रवचन व दिक्षा देण्‍यात आली. यावेळी आचार्य शिवमुनी आणि बसंतकंवर मसा यांनी दिपिकाला विचारले की, गृहस्‍थ जीवन किंवा संन्‍यासी जीवन यापैकी कोणता मार्ग निवडायचा आहे. याचा पुन्‍हा विचार कर. यावर दिपिकाने दिक्षा मार्गच निवडणार असल्‍याचे मुनींना सांगितले.
- केशवपन केल्‍यानंतर व साध्‍वीचा पोशाख परिधान केल्‍यानंतर दिपिकाला संत व साध्‍वीजवळ नेले गेले. मंत्रोच्‍चारामध्‍ये साध्‍वीचा दिक्षा समारंभ पार पडला. नंतर संत व साध्‍वींच्‍या मंजुरीनंतर दिपिकाला दिव्‍यांशी श्रीजी हे नवे नाव देण्‍यात आले. याद्वारे 21 वर्षांची दिपिका बसंतकंवर समुहामध्‍ये सर्वात छोटी साध्‍वी म्‍हणून सामील झाली आहे.  

पुढील स्‍लाइडवर पाहा, सांसारिक जीवनाचा त्‍याग करुन साध्‍वी बनलेल्‍या दिपिकाचे फोटोज....
 
बातम्या आणखी आहेत...