आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिर अयोध्येत नव्हे तर पाकिस्तानात बनेल काय, साध्वी प्राची यांचा सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपूर-अयोध्येतील राम मंदिर आमचे होते, आमचे आहे आणि भविष्यातही आमचेच राहील, असे विश्व हिंदू परिषदेच्या राष्ट्रीय नेत्या व दुर्गा वाहिनीच्या संस्थापक साध्वी डॉ. प्राची यांनी म्हटले आहे. अयोध्येत रामलल्लाचे मंदिर बनवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. राम मंदिर अयोध्येत नव्हे तर पाकिस्तानात बनेल काय? असा डॉ. प्राची यांनी टीकाकारांना उलट सवालही केला आहे.

दरम्यान, साध्वी प्राची जमशेदपूरमध्ये एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. यापूर्वी त्यांनी पत्रकारांना संबोधित केले.

साध्वी डॉ.प्राची यांनी बॉलिवूड अभिनेता आमिर खान, शाहरुख खान यांच्यासह समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर आरोप केले आहे. आमिर, शाहरुख व आझम खान देशाची प्रतिमा मलिन करत आहे. देशात असहिष्णुता वाढत असल्याची अफवा पसरवली जात आहे. तसेच काही देशद्रोहींनी आपापले पुरस्कार परत करून देशाला कलंकीत करण्याचे षडयंत्र रचत असल्याचे डॉ. प्राची यांनी म्हटले आहे. डॉ.प्राची एका पत्रकार परिषदेत बोलत होत्या.